विशेष प्रतिनिधी
ठाणे : मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ठाण्याच्या मुंब्रा परिसरात सोमवारी घडलेल्या भीषण अपघातात १३ प्रवासी लोकलमधून खाली पडले असून त्यातील ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कसारा आणि कल्याणदरम्यान प्रवासी दारात लटकत असताना हा अपघात घडला. या घटनेने प्रशासनाला जाग येताच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि लोकल ट्रेनच्या डब्यांचे डिझाइनच बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Mumbai local trains
बैठकीत मुंबईतील लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेबरोबरच ट्रेनमधील गर्दी, हवा खेळती राहण्याची व्यवस्था (व्हेंटिलेशन), आणि स्वयंचलित दरवाज्यांच्या गरजेवर चर्चा झाली. बैठकीला इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) चे अभियंते व तज्ज्ञही उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी दरवाजे बसवल्यास व्हेंटिलेशन अडचणीत येईल, अशी चिंता व्यक्त केली. परिणामी, सध्याच्या लोकल डब्यांमध्ये दरवाजे बसवण्याऐवजी पूर्णपणे नवीन कोचेस तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Mumbai local trains
- Devendra Fadnavis : आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयमी जीवनशैली आवश्यक, देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
रेल्वे प्रशासनाने नवे कोच डिझाइन करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेसह हवा खेळती राहील, याचीही विशेष दक्षता घेतली आहे. नवनिर्मित कोचेसमध्ये पुढील तीन सुविधा असतील. लूव्हर दरवाज्यांमध्ये हवा खेळती राहणाऱ्या विशेष पट्ट्यांचा समावेश असेल. यामुळे दरवाजे बंद असतानाही आत व्हेंटिलेशन कायम राहील. कोचच्या छतावर ताजी हवा आत खेचणारी व्हेंटिलेशन युनिट्स यंत्रणा बसवण्यात येणार आहे.वेस्टीब्यूल सिस्टिममध्ये प्रत्येक कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये सहज जाण्यासाठी वेस्टीब्यूल रचना असणार आहे. त्यामुळे फक्त काही डब्यांमध्ये गर्दीचा ताण येणार नाही.
या नव्या लोकल ट्रेनच्या मॉडेलचे उत्पादन नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर त्याची तांत्रिक चाचणी, परीक्षण आणि प्रमाणन होईल. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जानेवारी २०२६ पासून या नवनवीन कोचेससह लोकल ट्रेन मुंबईतील उपनगरीय मार्गांवर धावणार आहेत.
नवीन ट्रेनचे हे मॉडेल मुंबईसाठी खास डिझाइन करण्यात आले असून, सध्या धावणाऱ्या २३८ एसी लोकल गाड्यांव्यतिरिक्त हे नॉन-एसी मॉडेल असेल. यामुळे सामान्य प्रवाशांना सुरक्षित आणि हवा खेळती अशा प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
Government wakes up after Mumbai train accident; New coach design for Mumbai local trains
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी