विशेष प्रतिनिधी
मुंबई : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत हे चार महिन्यापूर्वीच्या तपासणीतच लक्षात आले होते तेव्हापासूनच त्यांना लाभ देणे बंद केले आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
लाडकी बहिण योजनेबाबत गैरसमज पसरवला जातोय. ही योजना चालू राहणार आहे. असं सांगतानाच लाडक्या बहिणींना मे महिन्यांचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे, असं आदिती तटकरे म्हणाल्या.
महिला आयोगासंदर्भातील बैठकीला काहींना निमंत्रित करता आले नाही. बैठकीतून काही सूचना येतील त्यावर कार्यवाही करू. काही बदल करण्याच्या सूचना आल्या तर त्या अंमलात आणू. महायुतीतून कुणी वैयक्तीक टीका केलेली नाही. महिला आयोगाच्या मर्यादा लक्षात घेणे गरजेचे आहे. सूचनांचा विचार नक्की करू, असंही तटकरे म्हणाल्या.
दरम्यान, मागील वर्षी महायुती सरकारला प्रचंड बहुमत आणि मुख्यत्वे मोठ्या प्रमाणावर महिलांचे मतदान मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेमधून बोगस आणि अपात्र महिलांना पैसे देणे हा निवडणुकपूर्व मोठाआर्थिक घोटाळाच होता असा आरोप आज आम आदमी पार्टी चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिला राज्य सरकारी कर्मचारी तसेच आर्थिक निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज प्रामुख्याने महायुतीच्या भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट,शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्टॉल लावून, पक्ष कार्यालयातून भरले.
हे सर्व फॉर्म निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोठ्या प्रमाणावर खोटी माहिती भरून पूर्ण केले गेले. त्यामुळे अपात्र महिलांनाही पात्र ठरवण्यामागे मुख्यत्वे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्तेच होते. इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यापासून दूर राहणेच पसंत केले होते. आता मात्र याच्यातून तब्बल वीस लाख महिला या अपात्र ठरवल्या जाणार असे उघड झालेल्या आकडेवारीवरून दिसते आहे. त्यामुळे या बोगस, अपात्र महिलांना निवडणुकीतील आमिष म्हणूनच कोट्यवधी रक्कमचे वाटप केले गेले, असा आरोप त्यांनी केला. Aditi Tatkare
Government women employees’ beloved sister benefit was stopped four months ago, Aditi Tatkare information
महत्वाच्या बातम्या
- Kumar Vishwas पाकिस्तानला महिलांची ताकद दाखवून दिली, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सोहळ्यात कुमार विश्वास यांचे प्रतिपादन
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगावच्या रिंगणात, बिनविरोध निवड होऊ देणार असल्याचा विरोधकांचा इशारा
- Narendra Modi : गोळीला आता गोळ्याने उत्तर मिळेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा
- Sanjay Raut : जे भाजपाला ‘चंदा’ देतील त्यांचा धंदा जोरात, संजय राऊत यांची टीका