प्रतिनिधी
मुंबई :महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले ‘हनी ट्रॅप’ प्रकरण आता अधिकच तापले असून, विरोधकांनी थेट भाजप सरकारला लक्ष केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी कवितेतून सरकारला लक्ष्य केले आहे. नाव न घेता महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना ‘मेकअप क्वीन’ म्हणत अप्रत्यक्ष टोला लगावला. “मेकअप क्वीनने तर बोलणेही टाळले, उगाच आपल्याच गोष्टी बाहेर काढतील, बहुतेक तिला कळले!” असे म्हटले आहे.
रोहिणी खडसे यांनी x या सोशल मीडिया अकाउंटवर एक कविता लिहिली आहे. सरकारवर टीका करत सत्ताधाऱ्यांच्या नैतिक अधःपतनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
“शरमेने खाली घातली महाराष्ट्राची मान,
हनी ट्रॅपच्या नादी लागून इज्जत ठेवली गहाण…”
अशा थेट शब्दांत त्यांनी मंत्र्यांचा समाचार घेतला. राज्यात सुरू असलेल्या हनी ट्रॅपच्या प्रकरणात अनेक मंत्र्यांची नावे चर्चेत असून, काही व्हिडीओ व ऑडिओ क्लिप्सदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. राज्य सरकारच्या महिला प्रतिनिधींची या संवेदनशील प्रकरणात निष्क्रियता आणि मौन यावर खडसे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. “आपला असेल तर शांत बसायचे, विरोधी असेल आरडाओरडायचे, जनतेला आता या दोघींची गेम कळाली” अशा ओळीत त्यांनी महिला सुरक्षेच्या मुद्यावर सरकारच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश केला आहे.
या पार्श्वभूमीवर खडसे यांनी ‘कदमांच्या पोराची जोरात सुरू आहे छम् छम्’, ‘दिवस आशांचेच ! कोण देईल यांना दम?’ असे म्हणत उच्चपदस्थ नेत्यांची थेट खिल्ली उडवली.
भारतीय जनता पक्षाच्या आमदार चित्रा वाघ महिलांच्या प्रश्नांवर आक्रमक असतात. मात्र या मुद्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. यावरून खडसे म्हणतात, “चिऊताई मात्र आता काढत नाही आवाज, कुणास ठाऊक, कुठे लापून बसली आहे आज…”
रोहिणी खडसे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की
शरमेने खाली घातली महाराष्ट्राची मान
हनी ट्रॅपच्या नादी लागून इज्जत ठेवली गहाण
भाजपचे मंत्री, संत्री सारेच अडकलेत
अब्रूचे धिंडवडे चहुबाजूंनी काढलेत
कदमांच्या पोराची जोरात सुरू आहे छम् छम्
दिवस आशांचेच ! कोण देईल यांना दम ?
चिऊताई मात्र आता काढत नाही आवाज
कुणास ठाऊक, कुठे लापून बसली आहे आज..
मेकअप क्वीनने तर बोलणेही टाळले
उगाच आपल्याच गोष्टी बाहेर काढतील, बहुतेक तिला कळले !
आपला असेल तर शांत बसायचे
विरोधी असेल आरडाओरडायचे
जनतेला आता या दोघींची गेम कळाली
सत्तेच्या नांदी लागून यांची मनं मळली…
Honey Trap” Row: Rohini Khadse Indirectly Targets Rupali Chakankar, Calls Her the ‘Makeup Queen’
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये आल्याने चर्चांना उधाण
- ते राजकारणाच्या कचराकुंडीत, सोबत जाईल तोही संपेल, मनोज तिवारी यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
- Vijay Wadettiwar : शिंदे सरकार हनीट्रॅपमुळे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा
- Nitesh Rane : खरा शकुनी मामा मातोश्रीवर, राज ठाकरे यांच्या सभेवरून नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा