Maharashtra Minister : योजनेंतर्गत रुग्णांकडून पैसे घेतल्यास रुग्णालयांवर गुन्हे दाखल होणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Maharashtra Minister महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना लागू असतानाही रुग्णांकडून पैसे आकारणाऱ्या रुग्णालयांवर यापुढे थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी विधानसभेत दिली.Maharashtra Minister

नाना पटोले, सुनील प्रभू, बबनराव लोणीकर आणि रत्नाकर गुट्टे आदी सदस्यांनी राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनांचा एकत्रित लाभ नागरिकांना मिळावा यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, या योजनांच्या अंमलबजावणीदरम्यान काही रुग्णालयांकडून अनियमितता झाल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत.Maharashtra Minister

या तक्रारींची दखल घेत आतापर्यंत राज्यात ३३८ प्रकरणांमध्ये सुमारे ६०.४७ लाख रुपयांचा दंड संबंधित रुग्णालयांवर आकारण्यात आला आहे. तसेच अकोला जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयाविरुद्ध योजना लागू असतानाही तपासण्या आणि शस्त्रक्रियांसाठी रुग्णांकडून पैसे घेतल्याच्या १२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.Maharashtra Minister



राज्य आरोग्य हमी सोसायटीने केलेल्या चौकशीत एका रुग्णाकडून घेतलेले पैसे परत करण्यात आले असून संबंधित रुग्णालयावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. उर्वरित ११ तक्रारीं संदर्भात संबंधित रुग्णालयांना नोटिसा देण्यात आल्या असून चौकशी सुरू आहे, अशी माहितीही आबिटकर यांनी दिली.

दरम्यान, महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आयुष्मान भारत योजनेचा समावेश केल्यानंतर उपचारासाठी समाविष्ट आजारांची संख्या १३५० वरून २३९९ पर्यंत वाढवण्यात आली असून उपचार पॅकेजेसमध्येही वाढ करण्यात आली आहे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या माध्यमातून तक्रारींचे परीक्षण करून त्वरित कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

याशिवाय योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहभागातून समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

योजनेंतर्गत रुग्णांकडून एक रुपयाही अतिरिक्त घेतल्याचे आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाईल, तसेच वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही मंत्री आबिटकर यांनी दिला.

Hospitals Charging Patients Under Govt Health Schemes to Face Criminal Cases: Maharashtra Minister Warns

महत्वाच्या बातम्या