विशेष प्रतिनिधी
मुंबई : विरोधकांत ‘हम साथ साथ है,’ अशी परिस्थिती काही दिसत नाही. ‘हम आपके है कौन’ अशीच परिस्थिती दिसते आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारला. Devendra Fadnavis
महायुती सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले , विरोधकांनी दिलेले नऊ पानांचे पत्र संपूर्णपणे वर्तमानपत्रांच्या बातम्यांवर आधारित आहे. बातम्यांचा खुलासा वाचला असता तर नऊ पानांचे पत्र अर्ध्या पानात देता आले असते. महायुती सरकारचे पहिले अधिवेशन आहे. सकारात्मक चर्चा करण्यासाठी विरोधकांना संधी होती . एक संवादाची संधी विरोधकांना होती. मात्र त्यांनी चहापानावर बहिष्कार टाकला आणि संवादालाच थांबवले. विरोधकांची संख्या कमी असली तरी त्यांच्या सूचनांचा आदर करु.
रोज मला एक स्थगितीची बातमी ऐकायला मिळते माझ्या कार्यालयाला विचारले तर त्यांच्याकडून सांगण्यात येते की आपण कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही. एखाद्या आमदाराने पत्र दिले तर त्या संदर्भात माहिती घ्यावी अशी सूचना केली जाते. त्यावर लगेच चर्चा सुरु होते की स्थगिती दिली एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात घेतलेल्या एकाही निर्णयाला स्थगिती दिलेली नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले माध्यमांनी बातम्या देताना दोन्ही बाजू ऐकून बातमी दिली पाहिजे. तुम्हाला एखादी बातमी मिळाली तर दुसऱ्या बाजूचा प्रसाद घेणे हे एक तत्त्व आहे. सरकारने खुलासा दिला नाही तर बातमी निश्चित छापा. सध्या डिजिटल मीडियामुळे एखादी बातमी इतकी पसरते की त्याच्यावर खुलासा करताना सरकारच्या नाकीनऊ येतात.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. कोणीही त्यांच्याविरुद्ध बोललं तर कारवाई होणार म्हणजे होणारच. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आम्ही काम करत आहोत. मात्र इशरत जहाँच्या नावाने रुग्णवाहिका सुरु करणाऱ्यांकडून आम्हाला शिवाजी महाराज समजून घ्यायचे नाही.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांनी लिहिले की १० लाख खाते बंद केले. सीएजीने दिलेल्या नियमानुसारच लाडक्या बहिणींना मदत दिली जाणार आहे. लाडक्या बहिणींमध्ये कपात केली जाणार नाही
सूडभावनेने आम्ही कोणावरही कारवाई करणार नाही, तसा आमचा तिघांचाही स्वभाव नाही आम्हाला जनतेला उतराई व्हायचे आहे. त्यासाठी आम्हाला काम करायचे आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची आम्ही तयारी ठेवली आहे. आमच्याकडे २३७ आमदार आहेत म्हणून कोणताही निर्णय रेटून नेण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही
Hum Saath Saath Hai,’ not ‘Hum Aapke Hai Kaun’ is the situation, Devendra Fadnavis taunt to the opposition
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…