विशेष प्रतिनिधी
मुंबई: Bhojpuri actor मी मराठी बोलत नाही, दम असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलून दाखवा,” अशी मुक्ताफळे भोजपुरी अभिनेता आणि भाजप खासदार दिनेश लाल यादव उर्फ ‘निरहुआ’ याने उधळली आहेत.Bhojpuri actor
मीरा रोड परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी एका फास्ट फूड विक्रेत्याला मराठीत बोलण्यास भाग पाडल्याचा प्रकार घडल्यानंतर, निरहुआने प्रतिक्रिया दिली. “मी मराठी बोलत नाही. मी भोजपुरी बोलतो. जर तुमच्यात दम असेल, तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा,” असे खुले आव्हानच त्याने दिले होते.
त्याच्या या वक्तव्यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याचे कान टोचले आहेत. यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला चांगलेच फटकारले. तू महाराष्ट्रात येऊन उभा रहा म्हणजे कळेल तुला तुझी भोजपुरी कुठे आहे? असे प्रत्युत्तर वडेट्टीवार यांनी निरहुआ याला दिले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकाच व्यासपीठावर येऊन मुंबईत मराठीत बोलण्याचा आग्रह पुन्हा ठामपणे मांडला. मुंबईत येऊन मराठी लोकांवर जो दादागिरी करेल, त्याला त्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा दिला. कालच्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळव्याला काँग्रेस नेते अनुपस्थित होते. पण आज काँग्रेस राज ठाकरेंच्या मदतीला धावली.
वडेट्टीवार म्हणाले, दिनेश लाल यादव निरहुआ भोजपुरी कलाकार असला तरी महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या भरोशावर मोठा झाला आहे, एखाद्या भाषेचा असा अपमान करणे म्हणजे त्या खासदाराच्या बुध्दीची दिवाळखोरी आहे, तू महाराष्ट्रात येऊन उभा रहा म्हणजे कळेल तुला तुझी भोजपुरी कुठे आहे? असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर हल्लाबोल केला. दोन भाऊ एकत्र आल्यामुळे शेलार यांना पहलगाम आठवायला लागले आहे, तुम्ही पाकिस्तानात जाऊन शंभर अतिरेकी मारल्याचे छाती ठोकून सांगत आहेत. मात्र पहलगामचे चार आतंकवादी अजून सापडलेले नाही, पुलवामामध्ये अडीचशे किलो आरडीएक्स आले, तुम्ही लोकांना वारंवार मूर्ख बनवू शकत नाही, त्यामुळे यांची भीती साहजिक आहे, दोन भाऊ एकत्र आल्यामुळे शेलार यांची पंचायत झाली आहे, म्हणून ते असे वक्तव्य करत आहे.
I don’t speak Marathi, if you have the guts, throw me out of Maharashtra, says Bhojpuri actor
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी