विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ramdas Athawale महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणाविरोधात वक्तव्य आरोप करत केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. जर राज ठाकरे यांनी आरक्षणविरोधी वक्तव्य मागे घेतलं नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांचा निषेध आणि बहिष्कार करावा, असे आवाहन आठवले यांनी केले.Ramdas Athawale
राज ठाकरे म्हणाले होते की सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे, पण त्यासाठी जातीवर आधार कशासाठी हवा?” “खाजगी क्षेत्रात नोकऱ्या वाढत असताना आपण आरक्षणाच्या नावाखाली केवळ गोंधळ निर्माण करतोय.या वक्तव्यावर आठवले यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले “आरक्षणामुळे वंचित, दलित, आदिवासी, ओबीसी समाजाला संधी मिळते.
महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे – मग ते गुजराती असोत की इतर कोणताही समाज.” पुढे ते म्हणाले, “मराठी न बोलणाऱ्यांना मारहाण करायची गरज नाही, पण जर कोणी मुद्दाम मराठी न वापरता नाटक करत असेल, तर त्याच्या कानाखाली मारून द्या. आणि ही घटना कुणी रेकॉर्ड करायची नाही, ज्याला मार खाल्लाय त्यानेच बोलावे, या विधानावर संताप व्यक्त करताना आठवले म्हणाले,
राज ठाकरे यांचा हा बोलण्याचा प्रकार निषेधार्ह आहे. हे वागणं फक्त दादागिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन देतं. महाराष्ट्रात सर्व भाषिक लोक राहतात. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि येथे मराठीप्रमाणे इतर भाषिकांचेही मोठे योगदान आहे. जर हे लोक तुमच्या भाषिक भूमिकेमुळे राज्य सोडून गेले, तर त्या सर्वांना नोकऱ्या देणार का राज ठाकरे?”
राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर मराठा समाजातही नाराजी व्यक्त केली जात आहे. पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ओबीसी आणि मराठा कोट्यावरील राजकीय खेळीवरही प्रश्न उपस्थित करत म्हटलं होतं की, “राजकीय नेते या समाजांना फक्त मतांसाठी फसवत आहेत, त्यांचं वास्तवात काहीही भलं होत नाही.”
If Raj Thackeray does not withdraw his statement against reservation, then MNS candidates will be boycotted, warns Ramdas Athawale
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी