विशेष प्रतिनिधी
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde आणि अजित पवार यांच्यात समन्वय असल्याचे दिसत असले तरी शिंदे यांना अजित पवार दरवेळी टोला मारतात याचे प्रत्यंतर अर्थसंकल्पानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतही आले.
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात राज्याचा 2025 – 26 या वर्षासाठी अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी एकत्रितपणे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की गेल्या वेळीही आम्ही तिघे होतो. खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली आहे,” असे म्हणताच अजित पवार हसायला लागले. एकनाथ शिंदेंच्या या विधानावर अजित पवारांनी त्यांना पुन्हा टोला मारला.
अजित पवारांनी अर्थसंकल्पाची माहिती दिली. अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, “गेल्या वेळीही आम्ही तिघे होतो. खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली आहे.” असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे विधान करताच अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इशारा केला आणि थेट म्हणाले, “ते काही यांच्या मनातून जात नाही. यावर पुन्हा एकनाथ शिंदे म्हणाले की, “खुर्च्यांची अदबलाबदल झाली असली तरीही टीम तीच आहे.” त्यावर मग मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “अदलाबदल झाली असली तरी बदलाबदल झालेली नाही.” असे विधान त्यांनी केले. यावर एकनाथ शिंदे यांनी पुढे अर्थसंकल्पाबाबत म्हणाले की, “आम्ही एक टीम म्हणून गेल्या अडीच वर्षांपासून चांगले काम करत आहोत. तेच काम आताही आम्ही पुढे घेऊन जात आहोत. आज आमच्या सरकारने मांडलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वांगिण विकासाला चालना देणारा असा अर्थसंकल्प आहे.” असे म्हणत आपली प्रतिक्रिया दिली.
विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतही एकनाथ शिंदेंनी असेच विधान केले होते. “सरकारची नवी टर्म असली, तरी आमची टीम जुनीच आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बोट दाखवत आमच्या दोघांच्या खुर्च्यांची अदलाबदल झाली आहे. अजितदादांची मात्र फिक्स आहे. दादांचे बरे आहे. नो टेन्शन,”, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. त्यावर एकनाथ शिंदेंना उद्देशून अजित पवार म्हणाले होते की, “तुम्हाला फिक्स ठेवता आली नाही, त्याला मी काय करू?”
It doesn’t cross their minds, Ajit Pawar again attacks Eknath Shinde’s CM post
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray तुमच्या बापाने मुंबई दिली नाही, ती मराठी माणसाने लढून मिळवली, उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका
- Uday Samant आता मंत्री उदय सामंत अडचणीत, वडिलांच्या कंपनीने महामार्गाच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप
- खोटे आरोप करण्याची हिम्मत… धनंजय मुंडे यांचा सुरेश धस यांना इशारा
- क्रूर, लुटारू औरंगजेबाचे खानदानच लुटेरे, बाबा रामदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श