विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde जय गुजरात या घोषणेवरून होत असलेल्या टीकेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे एका सभेत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असे म्हणतानाची व्हिडिओ क्लिप दाखवून जिनके घर शिशे के होते हें वो दुसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते, असा इशारा दिला आहे.Eknath Shinde
अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यातील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी थेट गुजरातची घोषणा दिली. त्यामुळे आता मोठे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विषयावर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, मराठी हा आमचा श्वास आहे, हिंदुत्व आमचा आत्मा आहे. मराठीबद्दल जे काही टीका करायचे काम करत आहेत. मी यावर भाष्य करू इच्छित नाही.
जय गुजरात नाऱ्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, पुण्यात एक कार्यक्रम होता. पुणे गुजराती नावाने एक संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून पुण्यात राहणाऱ्या गुजराती बांधवांनी मोठे जयराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधले आहे. तिथे हॉल आहे तसेच खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्याचे लोकार्पण होते. मी नेहमी जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणतच असतो. जय हिंद म्हणजे देशाचा अभिमान, जय महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान आणि शेवटी मी जय गुजरात म्हणालो, त्याचे कारण असे की समोर बसलेली सगळी मंडळी ही गुजराती होती. त्यांनी पिढ्यांपिढ्या या महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानली आहे आणि जो प्रकल्प उभा राहिला आहे तो सर्वांसाठी आहे. त्याची प्रशंसा आपण करत असतो म्हणून मी ते म्हटले.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
एकनाथ शिंदे म्हणाले, गुजरात पाकिस्तान आहे का? गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का? निवडणुकीत त्यांनी पाकिस्तानी झेंडे नाचवले, त्यावेळी मराठी प्रेम कुठे गेले होते? आमची नाळ या मराठीशी जोडली आहे, या मातीतच पुरलेली आहे. त्यामुळे मराठीच्या बद्दल आम्हाला शिकवण्याची गरज नाही. आम्ही मराठी मातीशी जुळलो आहोत, सुट्ट्या पण इथेच घालवतो आम्ही. त्यांनी केलेले मतासाठी होते. मी जे केले ते तिथल्या लोकांनी केलेल्या कामाची प्रशंसा करण्यासाठी. हे सगळे राजकारण करत असून यावर मी आत्ताच बोलणार नाही.
Jinke Ghar Shishe ke hote hai…Eknath Shinde told Uddhav
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी