विशेष प्रतिनिधी
बीड : सामाजिक स्वास्थ महाराष्ट्रातलं शांत राहिलं नाही पाहिजे का? जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकायचा धंदाच कळतो का? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना केला आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी न्यायासाठी आंबेडकर अनुयायांकडून परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला होता. मात्र हा लाँग मार्च मुंबईत पोहचण्याआधीच भाजप आमदार सुरेश धस आणि आमदार मेघना बोर्डीकर यांनी मध्यस्थी केल्यामुळे हा लाँग मार्च स्थगित करण्यात आला. यावरुन सुरेश धस यांचा एक व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर आता सुरेश धस यांनी पलटवार केला आहे.
सुरेश धस म्हणाले की, मी जितेंद्र आव्हाड साहेबांना आधीच उत्तर दिलं आहे. प्रत्येक मोर्चामध्ये मी जी संतोष देशमुखांची बाजू मांडलेली आहे. तेवढीच सोमनाथ सूर्यवंशी यांची बाजू परखडपणे मांडलेली आहे. त्या ठिकाणी जे मोर्चेकरी होते, मोर्चेकरांच्या संमतीने मोर्चा मिटवणे योग्य की अयोग्य. जर अयोग्य असेल तर जितेंद्र आव्हाड जसं म्हणतात ते. जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकायचा धंदाच कळतो का?
राज ठाकरेंची भेट घेण्यामागे हा डाव.. चंद्रकांत खैरे यांचा दावा
सामाजिक स्वास्थ महाराष्ट्रातलं शांत राहिलं नाही पाहिजे का? लाँग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला याच्यामुळे जितेंद्र आव्हाडांना पोटसूळ सुटलाय का? . जितेंद्र आव्हाड साहेब तुम्हाला स्वत:ला वाटत असेल की तुम्हीच फक्त फुले, शाहू, आंबेडकरवादीचे ठेकेदार आहात तसे नाही. आम्ही सुद्धा त्याच विचाराचे आहोत. हे प्रकरण कुठेतरी थांबलं पाहिजे. माझं पूर्ण वाक्य न घेता ते अपूर्ण वाक्यावरती ते कालपासून ट्रायल चालवली जात आहे.
ते म्हणाले की, बीड प्रकरण मी उचललं आहे आणि परभणी प्रकरण देखील मीच उचललं आहे. जितेंद्र आव्हाड मोर्चामध्ये होते, ते त्या मोर्चामध्ये बोलले नाहीत, मी बोललो. या मोर्चाला तर जितेंद्र आव्हाड आले नव्हते. जितेंद्र आव्हान माझं तुम्हाला आव्हान आहे सोमनाथ सूर्ववंशीबद्दल आणि परभणीबद्दल तुम्हाला फार वाटत असेल तर तुम्ही लाखाचा मोर्चा काढा ना. माझी भूमिका दुटप्पी नाही, बीड, परभणी, महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे.
Jitendra Awhad only know the business of pouring kerosene : Suresh Dhas
महत्वाच्या बातम्या
- आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने 22फेब्रुवारी पासून आंदोलन
- Arvind Kejriwal अरविंद केजरीवाल यांचा पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावर डोळा
- Shashi Tharoor शशी थरूर बनले पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे चाहते, ‘या’ मुद्द्यावर झाले सहमत
- Chief Minister Delhi दिल्लीला पुन्हा महिला मुख्यमंत्री मिळेल का? भाजपच्या संभाव्य उमेदवार कोण आहेत जाणून घ्या