Manoj Jarange : तू गोळ्या घालायला तर फक्त ये त्याचे दुष्परिणाम काय असतील हे तुला मग समजेल, मनोज जरांगे यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

धाराशिव : Manoj Jarange तू गोळ्या घालायला तर फक्त ये त्याचे दुष्परिणाम काय असतील हे तुला मग समजेल, ही माज आणि मस्ती आहे. आमचा समाजही मोठा आहे, उद्रेक कशाला म्हणतात, रक्त सांडणं कशाला म्हणतात, हे आणखी एकदा संपूर्ण भारत बघेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे.Manoj Jarange

गोळ्या घालायचं लांब राहिलं तू फक्त मला बघून जा, असे आव्हान जरांगे-पाटलांनी दिलं आहे. ते धाराशिव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या गँगने तुरूंगातही दहशत माजवल्याचं समोर आलं आहे. देशमुख हत्या प्रकरणात तुरूंगात असलेल्या सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर गुन्ह्यातील आरोपी शंकर शेर यांनी मिळून अझर अब्दुल रहमान पठाण, या कैद्याला मारहाण केल्याचं समोर आले आहे.Manoj Jarange



अझर अब्दुल रहमान पठाणने एका व्यक्तीला आपली सगळी हकीकत सांगितल्याची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. तसेच, या ऑडिओ क्लीपमध्ये मराठा आरक्षणाचे नेते, मनोज जरांगे-पाटील यांना गोळ्या घालण्याचा देखील उल्लेख आहे.

सदर आरोपींनी माझ्यासमोर गोंविद फड नावाच्या व्यक्तीला सांगितलं की जरांगे-पाटीलला गोळ्या घाल, लागतील तेवढे पैसे आम्ही देतो,’ असा दावा अझर अब्दुल रहमान पठाण एका व्यक्तीला बोलताना केला आहे. एकप्रकारे सुदर्शन घुले, प्रतीक घुले यांनी असे वक्तव्य केल्याचा रोख अझर अब्दुल रहमान पठाणचा ऑडिओमध्ये आहे.

just try firing bullets, you’ll face the consequences,” warns manoj jarange

महत्वाच्या बातम्या