विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप करत वांद्रे दंडाधिकारी कोर्टात तीन स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. धनंजय मुंडे यांच्या धमक्या आणि छळ अजूनही सुरूच असून, स्वतः मुंडे यांनी “18 तुकडे करीन” अशी धमकी दिल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
आमदारकी रद्द होण्याची नोटीस आल्यापासून त्यांना सतत धमक्या मिळत आहेत. ऑक्टोबर 2020 पासून राहिलेली 60 लाख रुपयांची पोटगी थकबाकी वसूल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आपल्या अर्जात करुणा मुंडे यांनी म्हटले आहे की, धनंजय मुंडे व त्यांच्या समर्थकांकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने मॉर्फ केलेले अश्लील व्हिडिओ व फोटो पाठवून मानसिक त्रास दिला जात आहे. व्हॉट्सअॅप चॅट आणि एनसी यासारखे पुरावे देखील कोर्टात सादर करण्यात आले असून, पोलीस मात्र कोणतीही कारवाई करत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
न्यायालयाने पूर्वी दिलेल्या आदेशानुसार, मुंडे यांनी पुढील त्रास देऊ नये. मात्र, त्या आदेशांचा भंग होत असून अजूनही जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयाने याप्रकरणी कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
शर्मा यांनी कोर्टाकडे 60 लाख रुपयांची थकबाकी वसूल करून देण्याची तसेच त्यांच्या मालमत्तांची विक्री रोखण्यासाठी आदेश देण्याची मागणी केली आहे.
“लव्ह जिहादपेक्षा जास्त अन्याय माझ्यावर झाला आहे,” असं म्हणत करुणा शर्मा यांनी या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे.
Karuna Munde accuses Dhananjay Munde again; Threatened to cut her into 18 pieces, harassed through AI clips
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती