विशेष प्रतिनिधी
ठाणे : हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा सुरु असतानाच करूणा मुंडे यांनी हा हनी ट्रॅप नसून पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. ‘होमगार्ड आलेल्या महिलेवर दोन एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यानी लैंगिक अत्याचार केला आहे. तिने तक्रार दाखल करू नये म्हणून पोलिसांनी तिच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल केला, असेही त्यांनी म्हटले आहे. Karuna Munde
करुणा मुंडे यांनी पिडीतेसोबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत या पीडित महिलेने अनेक गोष्टी मांडल्या आहेत. पीडित महिलेने तिच्या मुलींना देखील त्रास देण्याचे काम सुरु आहे, असा आरोप केला आहे. गेले सहा महिने ही पीडिता न्यायासाठी दाद मागत आहे. मात्र तिची मदत करायला कोणीही तयार नाही. या प्रकरणात एसीपी आरोपी असल्याचे तिची मदत करायला कोणी तयार नाही, असे करुणा मुंडे म्हणाल्या. Karuna Munde
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
ठाणे शहरातील एका एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याने माझ्याशी ओळख करून घेतली. मी तुम्हाला ओळखतो, असे सांगून त्याने माझा मोबाईल नंबर मागितला. मोबाईलवर तो चांगले मेसेज करत होता. एके दिवशी त्याने मला त्याच्या घरी बोलावले. तुम्ही माझ्या घरी चहा प्यायला यावे अशी बायकोची इच्छा असल्याने सांगत त्याने एका महिलेशी बोलणे करून दिले. मी बायको बोलली आहे समजून त्याच्या घरी गेले. तिथे गेल्यावर त्याने मला पाण्यातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्याने आणि आणखी एका पोलिसाने माझ्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप पीडितेने केला आहे.
राज्यातील काही मंत्री, ७२ हून अधिक अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत. हनीट्रॅप करणाऱ्यांची गोपनीय माहिती गोळा केली जात आहे. तसेच काही अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं असून त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा विचार केला. सरकार यावर काही बोलायला तयार नाही. त्यामुळे मी हा विषय विधानसभेत मांडत आहे, असे पटोले म्हणाले. हनी ट्रॅपच्या माध्यमातून राज्याची महत्त्वाची कागदपत्रं अँटी सोशल मुव्हमेंटच्या हाती चालली आहेत. मला कुणाचंही चारित्र्यहनन करायचं नसून या सगळ्याबाबत सरकार गंभीर नाही. साधं निवेदनही द्यायला तयार नाही. त्यामुळे अध्यक्षांनी याबाबत निर्देश द्यावेत, अशी विनंती नाना पटोलेंनी केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनी ट्रॅपचा प्रकार फेटाळून लावला आहे. नाना पटोले यांनी कोणता बॉम्बच आणला म्हणे. तो बॉम्ब आमच्यापर्यंत आलाच नाही. तुमच्याकडे असला तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना. ना हनी आणि ना ट्रॅप आहे. नाना पटोले, कोणती घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे. आता आजी-माजी मंत्री सगळे एकमेकांकडे पाहत आहेत. कोणत्याही आजी-माजी मंत्र्यांची हनी ट्रॅपबाबत तक्रारही नाही. पुरावेही नाहीत जाणीव अशी घटनाही समोर आलेली नाही, असे म्हटले आहे.
Karuna Munde brings the victim of the honey trap case to the fore
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला