Keshav Upadhyay : हिंदी विरुद्ध मराठी संघर्ष जाणीवपूर्वक दाखविण्याचा प्रयत्न, केशव उपाध्ये यांचा राज ठाकरेंवर आरोप

Keshav Upadhyay : हिंदी विरुद्ध मराठी संघर्ष जाणीवपूर्वक दाखविण्याचा प्रयत्न, केशव उपाध्ये यांचा राज ठाकरेंवर आरोप

Keshav Upadhyay

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Keshav Upadhyay हिंदी विरुद्ध मराठी असा संघर्षच नाही. मात्र, राज ठाकरे जाणीवपूर्वक दाखविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.Keshav Upadhyay

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मीरा भाईंदर येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी मराठी भाषेच्या मुद्यावरून तसेच हिंदी भाषेच्या धोरणावरून सरकारवर हल्लाबोल केला. यावर केशव उपाध्ये म्हणाले, मराठी सक्तीची आहे मात्र हिंदी सक्तीची नाही हे देवेंद्रजींनी स्पष्ट केले आहे. तसेच महापालिका निवडणुका जवळ आल्या की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न आहे, अशी भाषणे काही नेते वर्षानुवर्षे करत असतात. राज ठाकरेंनी तीच री ओढावी, हे दुर्दैव आहे, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.Keshav Upadhyay

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. शिवतीर्थावर मी मोदींना सांगितले होते मराठी भाषेला तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा द्या. दर्जा मिळाला पण एक रुपया निधी मिळाला नाही. एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर कमीत कमी 1400 वर्षांचा इतिहास हवा, हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला अजून 1200 वर्ष आहे. आणि ही भाषा तुम्ही आमच्यावर लादणार? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांना देखील त्यांनी इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, बिहारचा खासदार दुबे हा आम्हाला म्हणतो की, तुम्ही आमच्याकडे येऊन दाखवा, तुम्हाला पटक पटक के मारेंगे. या खासदारावर केस झाली का? याचा विचार तुम्ही आम्ही करायला हवा. कारण या नेत्यांना बोलतांना माहिती असते की, सरकार आपल्या पाठिशी आहे. त्यामुळे ही अशा प्रकारची भाषा करत असतात. पण दुबे मी तुम्हाला सांगतोय की, तुम्ही मुंबईत येऊन दाखवा. तुम्हाला मुंबईच्या समुद्रात डुबो डुबो के मारेंगे

Keshav Upadhyay accuses Raj Thackeray of deliberately trying to show Hindi vs Marathi conflict

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023