विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aditya Thackeray शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी दिलेली क्लीन चिट दिशाच्या वकिलांनी साफ नाकारली आहे. आमच्याकडे काही महत्त्वाचे पुरावे आहेत. लवकरच हे पुरावे आम्ही न्यायालयासमोर सादर करू, असा इशारा दिशा सालियनचे वकील निलेश ओझा यांनी दिला आहे .( The sword is still hanging over Aditya Thackeray, lawyers claim that there is important evidence in the death case of manager Disha Salian)
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात आला होता. दिशाची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करून प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र या याचिकेवर पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर करून दिशा सालियनची हत्या झाल्याचं किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही, अशी माहिती उच्च न्यायालयात दिली.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
यावर वकील निलेश ओझा म्हणाले, तपास अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. कारण त्यांनी चुकीचा रिपोर्ट सादर केला आहे. वैद्यकीय रिपोर्ट कोणीही देऊ शकतो. सरकारलादेखील न्यायालयाने वेळ दिला आहे. दिशाच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही लवकरच काही महत्त्वाचे पुरावे न्यायालयात सादर करणार आहोत.
मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केलं. या प्रतिज्ञापत्रात सतीश सालियन यांनी केलेल्या दाव्यांचं खंडन केलं आहे. प्रतिज्ञापत्रात घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं हे नमूद केलं आहे. तसंच घटनेच्या वेळी दिशासह असलेला तिचा प्रियकर आणि मित्रांनी दिलेल्या जबाबात सत्य असल्याचे म्हटले आहे.
याप्रकरणी अनेक साक्षीदारांच्या जिवाला धोका आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचं लोकेशन कुठे होतं? त्यांना पत्रकारांना उत्तर देता येत नाही. पण ते न्यायालयावर ढकलत आहेत. न्यायालयातही उत्तर सादर करत नाहीयेत, असे ओझा म्हणाले.
Lawyers claim to have important evidence against Aditya Thackeray in Disha Salian’s death case
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी