विशेष प्रतिनिधी
पुणे : महाविकास आघाडी आणि महायुतीच्या काळात एखादा चांगला निर्णय असेल तरी समोरचा वाईट म्हणायचा. गेल्या पाच वर्षात आपण अनुभवले. मात्र अहमदनगरचे अहिल्यानगर करताना कोणत्याही नेत्यांनी पक्षाने विरोध केला नाही, असे सांगत विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी महा विकास आघाडीचे कौतुक केले आहे.
पुण्यात आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विशेष अंक प्रकाशन सोहळा प्रसंगी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रीशताब्दी जन्म वर्ष निमित्ताने एकता मासिकाचा विशेष अंकाच्या प्रकाशित केला आहे.- मी माझं भाग्य समजतो आपण त्रीशताब्दी जन्म वर्ष निमित्तान विशेष अंक काढला. विशेष अंकांची पान चाळत असताना मासिकाच्या माध्यमातून अहिल्याबाईंच्या जीवनावर जास्तीत जास्त माहिती देण्याच काम केल आहे.
शिंदे म्हणाले, मी चोंडी गावातून येतो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या माहेरच्या वंशांतील एक घटक आहे. मोगलांनी आक्रमण केलं तेव्हा आपला धर्म आणि मंदिर टिकवण्याचं काम अहिल्यादेवीनी केले.
आपल्या आठवणी सांगताना राम शिंदे म्हणाले, चोंडी गाव १९९५ पर्यंत अतिशय अडगळीत पडलं होतं. त्या गावाला जायला रस्ताही नव्हता. मी ज्यावेळेस हायस्कूल मध्ये होतो त्यावेळी आमचं तहसील ऑफिस जामखेड होते. ऑफिस समोर पंचायत समितीचे एक कार्यालय आहे मी अतिशय उत्सुकतेने पाहायला त्या पंचायत समितीमध्ये गेलो. ऑफिसमधल्या नकाशामध्ये 87 गावांची नावे होती मात्र त्यामध्ये चोंडी गावाचं नाव नव्हतं. 1995 साली राष्ट्रीय सेवा समिती यांची राष्ट्रीय कार्यशाळा चोंडी मध्ये झाली. देशभरातून महिला चोंडी गावात आल्या. मलाही उत्सुकता वाटली. त्यावेळी आमच्या गावा पुरतीच मर्यादित जयंती आणि पुण्यतिथी व्हायची. कोणालाही अहिल्याबाई विषयी माहिती फार कौतुक किंवा माहिती नव्हती.. फोटो देखील त्याकाळी सापडत नसायचा, आम्ही त्या घरांमध्ये जन्म घेतला.
भाजपचे आभार मानताना ते म्हणाले, पुढच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीने अण्णासाहेब डांगे यांना विरोधी पक्षनेता केलं. 95 साली सत्तेत आल्यानंतर चोंडी विकास आराखडा तयार करण्यात आला. तिथून पुढे खऱ्या अर्थाने चोंडीची ओळख तालुक्याला जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला होऊ लागली. अण्णा डांगे देखील चोंडी शोधायला आले. ते आधी परभणी जिल्ह्यातील चोंडी मध्ये गेले, बीड जिल्ह्यातील एका चोंडी गावी गेले नंतर या चोंडी गावात आले.
आपल्या राजकीय प्रवासाबाबत सांगताना ते म्हणाले, कॉलेज जीवनापासूनच मी अहिल्याबाई होळकर मित्रमंडळाच्या माध्यमातून काम करायचो. त्यामुळे राजकारणाची ओढ तर होतीच. कोणताही कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी चोंडी गावचा विकास करण्याच्या दृष्टीने शासनाने समिती घटित केली. त्या समितीचा सदस्य म्हणून काम केले. 1996 ला राष्ट्रपतीनी चोंडी गावाला भेट दिली. लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी देखील भेट दिली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी अनेकदा भेट दिली. त्यानंतर हे जन्मस्थळ हळूहळू समोर आलं. आता अतिशय चांगल्या पद्धतीने चोंडी गावचा विकास झालेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचे रस्ते आहेत.
अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यात देखील समितीची आणि मी यशस्वी झालो सांगताना राम शिंदे म्हणाले, औरंगाबादचे नामकरण व्हायला चाळीस वर्षे लागली. पण 16 महिन्यामध्ये अहमदनगरचे अहिल्यानगर झाले. अहिल्यानगर नावाची मागणी देवेंद्र फडणीस यांनी केली. त्याला दुजोरा देत एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. लोकसभेच्या आधी तो प्रस्ताव दिला गेला आणि अंमलबजावणी देखील झाली .
पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर, धनंजय मुंडे यांना मोठा धक्का, अजित पवार पुण्यासह बीडचे पालकमंत्री
सुमित्रा महाजन यांनी देखील अतिथी संपादक म्हणून अहिल्या या नावाने लेख लिहिला आहे. सुनिता महाजन इंदूरमधून नऊ वेळा निवडून आल्या. अहिल्याबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केले, अशा शब्दांत त्यांनी आभार मानले.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या महान कार्य तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आहे. आपला देश हा पुरुषप्रधान संस्कृती असलेला देश आहे. मात्र आपल्या देशामध्ये कधीतरी स्त्रियांना कोणते स्थान होत हे सांगायची गरज नाही. अहिल्याबाई यांनी त्याकाळी असामान्य कर्तृत्व करून इतिहास रचला. महाराष्ट्र नव्हे देश पातळीवर त्यांनी आपलं नाव केलं आक्रमकानी तोडलेली सर्व मंदिर पुन्हा निर्माण करण्याचे काम त्यांनी केला.
1780 साली काशी विश्वेश्वराचा जर्णोधार अहिल्याबाई होळकर यांनी केला. त्यानंतर 2022 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून हा जिर्णोद्धार करण्यात आला. बारा ज्योतिर्लिंग यांचा त्यांनी पूर्ण विकास केला. घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या. एक न्यायप्रिय आणि कर्तबगार महिला शासक म्हणून त्या आज देखील आदर्श आहेत. सैन्यामध्ये महिलांची तुकडी निर्मिती केली. आजच मी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशाला स्वामित्व योजना दिली असेही ते म्हणाले.