विशेष प्रतिनिधी
मुंबई : महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) नाराज आहेत, त्यांनी सोमवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. भाजपाने आम्हाला विचारले नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीत आल्यावर भाजपाला छोट्या पक्षांची गरज नाही. त्यामुळे दुसरा पर्याय निवडला पाहिजे, हा विचार केला. राहुल गांधी यांनी पक्ष कार्यालयात बोलावले नाही, घरी बोलवले होते. मला सन्मानाची वागणूक दिली, असे त्यांनी सांगितले.
महायुतीसोबत असलेले महादेव जानकर इंडिया आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची महादेव जानकर यांनी भेट घेतली. या भेटीबाबत महादेव जानकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, माझाही पक्ष आहे. पक्षाला पक्षाप्रमाणे वागणूक मिळायला पाहिजे. मात्र भाजपने तशी वागणूक दिली नाही.
जानकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की, त्यांनी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करायचे आश्वासन दिले होते, ते पाळले गेले पाहिजे. धनगर समाजाचा एसटीमध्ये समाविष्ट करावा आणि मराठा आरक्षण द्यावे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना बंद करू नये.
माझ्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे मोठे आहेत. मोठा पक्ष छोट्याला दाबतो, त्याचा अनुभव त्यांना येईल. आमच्यासाठी भाजपाने दार बंद केली आहे. आमची काही चूक नाही, अशी खंत जानकर यांनी बोलून दाखवली. अखिलेश यादव यांच्याशी चर्चा झाली. यापुढे स्टॅलिन, शरद पवार, तेजस्वी यादव यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास अघाडीत असलेले महादेव जानकर महायुतीत आले होते. त्यानंतर महादेव जानकर यांना महायुतीने परभणी लोकसभा निवडणुकीत उतरवले होते. परंतु मविआचे उमदेवार संजय जाधव यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर राजकीय पुनर्वसन होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. महायुती सत्तेत आल्यानंतर त्यांना सत्तेत काही स्थान मिळाले नाही.
Mahadev Jankar said BJP did not ask, Rahul Gandhi treated him with respect
महत्वाच्या बातम्या
- Pakistan पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई; पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी
- Neelam Gorhe : पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना चौकशीचे निर्देश
- Sonu Nigam : सोनू निगमवर गुन्हा दाखल, कन्नडमध्ये गाणे गायचा आग्रह अन् म्हणाला यामुळेच पहलगाममध्ये युद्ध झालं…
- Ajit Pawar : तर अजित पवार, एकनाथ शिंदे हाेऊ शकतात मुख्यमंत्री… संजय राऊत यांचा दावा