Yogesh Kadam : डान्सबार चालवणारे गृहमंत्री महाराष्ट्राला नको, योगेश कदम यांच्या राजीनाम्याची अंजली दमानिया यांची मागणी

Yogesh Kadam : डान्सबार चालवणारे गृहमंत्री महाराष्ट्राला नको, योगेश कदम यांच्या राजीनाम्याची अंजली दमानिया यांची मागणी

Yogesh Kadam

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Yogesh Kadam डान्सबार चालवणारे गृहमंत्री महाराष्ट्राला नको, अशा शब्दात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सावली बारची पाहणी करत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला.गृह राज्यमंत्री यांच्या आईच्या नावाने बारचा परवाना असल्याने कदम यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे.Yogesh Kadam

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सावली बार मध्ये जाऊन बारची पाहणी केली. कारवाई झाल्यानंतर हा बार बंद करण्यात आला आहे. या संदर्भात आपण सर्व कागदपत्रांची पाहणी केल्यानंतरच बोलणार आहे. या बारमध्ये काही चुकीचे होत नव्हते तर बार बंद ठेवण्याची वेळ का आली? असा प्रति प्रश्न दमानिया यांनी विचारला आहे.

आज या बार आणि परिसराची पाहणी केली असता या ठिकाणी डान्सबार होता, असेच दिसून आले आहे. या संदर्भात आपण या एफआआयची पूर्ण कॉपी वाचलेली आहे. म्हणूनच आपण पोलिस अधिकाऱ्यांची देखील भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

योगेश कदम यांना याआधी देखील बीड मधील डान्सबार प्रकरणाचे व्हिडिओ पाठवत त्यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली होती. मात्र त्यांनी संबंधित डान्सबार वर कोणतीच कारवाई केली नव्हती. त्यानंतर मी ते व्हिडिओ मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या बीडमधील डान्सबारवर कारवाई झाली होती. मात्र योगेश कदम यांनी कारवाई का केली नाही? याचा उलगडा मला आज झाला असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले आहे.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा गाजला होता. अनिल परब यांनी विधानपरिषदेत उपरोक्त आरोप केला होता. अनिल परब अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना म्हणाले की, मुंबईच्या कांदिवाली भागात सावली बार आहे. तिथे पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. या कारवाईत 22 बारबालांसह 22 कस्टमर व 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा दाखल करून आढळलेल्या ग्राहकांवर गुन्हा दाखल केला. गंभीर गोष्ट म्हणजे या बारचे परमिट ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. या महिला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आहेत. राज्यात डान्सबारवर बंदी असताना हा बार सुरू कसा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

Maharashtra does not want a Home Minister who runs a dance bar, Anjali Damania demands Yogesh Kadam’s resignation

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान भारतासाठी गौरव, मराठी जनतेसाठी अभिमानास्पद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्तव्यपूर्ती सोहळ्यात प्रतिपादन

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023