विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadanvis राज्यातील बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालणारे आणि धर्मांतर प्रक्रियेला कायद्याच्या चौकटीत आणणारे महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक मंगळवारी (17 मार्च) विधान परिषदेत प्रदीर्घ चर्चेअंती बहुमताने मंजूर करण्यात आले. विधानसभेत सोमवारी (16 मार्च) या विधेयकाला बहुमताने मान्यता देण्यात आली होती.Devendra Fadanvis
विधिमंडळाने विधेयक मंजूर केल्याने बेकायदा धर्मांतराला आळा घालणाऱ्या कायद्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशात असा कायदा करणारे महाराष्ट्र हे तेरावे राज्य ठरणार आहे. धर्मस्वातंत्र्याच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीररीत्या होणारे धर्मांतर रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत हे विधेयक मांडले होते. विधानसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर सरकारने दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी विधेयक विधान परिषदेतही चर्चेसाठी आणले. गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधेयक सादर करताना सरकारची भूमिका स्पष्ट केली.Devedra Fadanvis
भारतीय संविधानामध्ये नागरिकांना धर्मस्वातंत्र्याचा मूलभूत हक्क देण्यात आला असला तरी हा हक्क सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या चौकटीत येतो. मागील काही वर्षांत देशात एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बळजबरीने किंवा फसवणुकीद्वारे धर्मांतर करण्याच्या घटना समोर आल्याने सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशातील काही राज्यांनी बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी धर्मस्वातंत्र्य अधिनियम लागू केले आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने “महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026” नावाने कायदा आणण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, अशी माहिती भोयर यांनी दिली.
विधेयकाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिला. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांनी विधेयकातील त्रुटींवर बोट ठेवत विरोध केला. धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा दावा सरकार करत असले तरी कोणत्या धर्माच्या धर्मांतराच्या घटना वाढल्या आहेत, याबाबत सरकारने खुलासा करावा. जाणीवपूर्वक जनतेच्या मनात भीती घालू नये, असे आवाहन करत जबरदस्ती, आमिष किंवा फसवणूक करून धर्मांतर होत असेल तर त्याला कायम विरोध राहील, असे विरोधकांनी स्पष्ट केले. दोन्ही बाजूने झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले.
Maharashtra Devendra Fadanvis Freedom of Religion Bill Passed in Legislative Council
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास