विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray मराठी हा मोर्चाचा अजेंडा, कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आजचा हा मेळावा कुठलाही झेंडा न घेता मराठी ही अजेंडा समोर ठेवून घेण्यात आला आहे. महाराष्ट्राकडे कुणी वेडा वाकड्या नजरेने पाहायचे नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. Raj Thackeray
राज्य शासनाने हिंदी सक्ती रद्द केल्याच्या निमित्ताने मुंबई येथे आयोजित विजयी मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते,
सन्माननीय उद्धव ठाकरे अशी भाषणाला सुरवात केली. करत राज ठाकरे म्हणाले, मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचे एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभे राहिले असते. नुसत्या मोर्चाच्या चर्चेने माघार घ्यावी लागली. बाळासाहेबांना जमले नाही ते आज घडले. आजचा हा मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. संपूर्ण मैदान ओसंडून वाहिले असते. पाऊस असल्याने जागा मिळत नाही म्हणून हा कार्यक्रम इथे करावा लागला. माझ्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे.आज जवळपास 20 वर्षांनंतर मी आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येत आहोत. जे माननीय बाळासाहेब ठाकरे यांना जमले नाही, जे अनेकांना जमले नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचे ते देवेंद्र फडणवीस यांना जमले.
राज ठाकरे म्हणाले की, मुळ विषय सोडून अनेकांना बाकीच्या गोष्टीमध्ये जास्त रस असतो. सायंकाळी आता चर्चा सुरू होतील की कोण कमी हसले, कोण कमी बोलले. आजचा हा मेळावा कुठलाही झेंडा न घेता मराठी ही अजेंडा समोर ठेवून घेण्यात आला आहे. महाराष्ट्राकडे कुणी वेडा वाकड्या नजरेने पाहायचे नाही. हिंदीचा प्रश्नच नव्हता अचानक कुठून हा विषय आला. लहान मुलांना हिंदी शिकावी ही जबरदस्ती तुम्ही करत आहात.कुणाला काहीच विचारायचे नाही शिक्षण तज्ञांचे मत विचारात घ्यायचे नाही. केवळ आमच्याकडे बहुमत आहे म्हणून आम्ही निर्णय लादणार.तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात रस्त्यावर आमच्याकडे सत्ता आहे.
मी एक पत्र लिहले, दुसरे लिहले मग दादा भुसे माझ्याकडे आले.मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो समजून घ्या. ऐकूण घ्या. म्हटले दादा तुम्हाला एक सांगतो तुम्ही काय सांगता ते ऐकूण घेईल पण ऐकणार नाही. त्रिभाषा सूत्र हे केवळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील दूवा म्हणून आणण्यात आले. आज सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात इंग्रजी आहे तिथे हे सूत्र नाही. केंद्रीय शैक्षणिक धोरणातही हे सूत्र नाही.इतर कोणत्या राज्यात ही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करुण पाहिला. दक्षिणेतील राज्य तर यांना विचारतही नाही. पण महाराष्ट्र पेटून उठला की काय होते हे सत्ताधाऱ्यांना दिसले असेल. त्याशिवाय का माघार घेतली, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, मी त्या दिवशी दादा भुसेंना सांगितले उत्तरेकडील राज्य कोणती तिसरी भाषा आणणार आहेत. त्यांनी तिसरी भाषा आणली पाहिजे. हिंदी भाषीक राज्य हे आर्थिकदृष्या मागस आहेत.हिंदी न बोलणारी राज्य आर्थिक दृष्टीने प्रगत आहे, यावरही आम्ही हिंदी शिकायचे. यांना हिंदीतून राज्य सांभाळता आली नाही त्यांचा विकास करता आला नाही. हिंदी न बोलणाऱ्या राज्यात हिंदी बोलणाऱ्या राज्यातून लोक कामासाठी येत आहे. हिंदी कुणासाठी शिकायचे मुलं काय हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जाणार आहे का? हिंदी भाषेबद्दल मला कधीच वाईट वाटत नाही. भाषा कोणतीही श्रेष्ठच असते. एक लिपी उभी करण्यासाठी खूप ताकद लागते. भाषा अशीच उभी राहत नाही.
राज ठाकरे म्हणाले की, अमित शहा म्हणाले पुढे इंग्रजी येणारे म्हणतील की मला इंग्रजी येते हे सांगण्याची लाज वाटेल पण त्यांनाच इंग्रजी येत नाही. 125 वर्षे मराठ्यांनी राज्य केले पण आम्ही कुणावर मराठी लादली का? 200 वर्षांपूर्वी हिंदी आली, शिवरायांच्या काळात हिंदी नव्हती. हिंदीचे काय करायचे आहे नेमके, यांनी फक्त मुंबई वेगळी करता येते का यासाठी भाषेला डिवचून बघू महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कुणाची माय व्यायली आहे त्याने महाराष्ट्राला, मुंबईला हात घालून दाखवावा. आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू आहोत असा नाही. आता माघार घेतली तर प्रकरण वेगळ्या ठिकाणी वळवत ठाकरेंची मुले इंग्रजी माध्यमामध्ये शिकलीकडे वळवलं. दादा भुसे मराठी माध्यमामध्ये शिकले आणि राज्याचे शिक्षणमंत्री झाले.देवेंद्र फडणवीस इंग्रजी माध्यमामध्ये शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकले याचा काय संबंध. कोणाकोणाची मुलं परदेशात शिकताय याची यादी आहे आमच्याकडे. मंत्रिमंडळातील एकेकाची हिंदी ऐका फेफर येईल.
आम्ही मराठी माध्यमात शिकलो आणि आमची मुलं इंग्रजी माध्यमामध्ये शिकली. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे, आणि माझे वडील हे इंग्रजी माध्यमामध्ये शिकले. या दोघांवर तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकतात का? लालकृष्ण अडवाणी हे मिशनरी शाळेत शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? दक्षिण भारतात सर्व जण भाषेसाठी एकत्र येतात पण तिथे असले प्रश्न उपस्थित केले जात नाही. उद्या मी हिबरूमध्ये शिकेल आणि मराठीचा अभिमान बाळगेल. तुम्हाला काय समस्या आहे का? असा सवाल त्यांनी केला.
राज ठाकरे म्हणाले की, तुम्ही कुठे शिकलात यावर तुमचा कडवटपणा नसतो तर तो आतमध्ये असावा लागतो. बाळासाहेब ठाकरे इंग्रजी शाळेत शिकले, इंग्रजी वृत्तपत्रासाठी काम करत होते पण मराठीचा अभिमानासाठी त्यांनी तडजोड केली नाही. सैन्यदलांमध्ये वेगवेगळ्या प्रांतामधील लोकं हेत ते शत्रू दिसला की तूटून पडतात त्यांना भाषेचा प्रश्न आला का? मग एक भाषा लोकांना बांधून ठेवते याचा काय अर्थ? या गोष्टीमागे काय राजकारण आहे? मराठी म्हणून आपण सर्वजण एकत्र आलो आहोत, लक्षात ठेवा हे आता जातीचे कार्ड खेळतील मराठी म्हणून एकत्र होऊ देणार नाही. काल मीरा-भाईदरमध्ये एकाला मारले तर गुजरात्याला मारले का? अजून तर काहीच केले नाही अर्थात त्यांना मराठी आली पाहिजेच, पण त्यासाठी ऊठसूट मारहाण करण्याची गरज नाही, पण जास्त नाटकं केली तरी कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. पण चूक त्यांची पाहिजे. अश्या गोष्टीचे व्हिडीओ काढू नका. मारणारा सांगत नसतो. मार खाणारा सांगत असतो. मला मारले त्यांना सांगू द्या.उगाच कुणाला मारु नका.
राज ठाकरे म्हणाले की, 1999 मध्ये शिवसेना- भाजपचे सरकार येणार नाही येणार अशी परिस्थिती होती. मी मातोश्रीवर खाली बसलो होतो तेव्हा प्रकाश जावडेकर आले ते म्हणाले बाळासाहेबांना भेटायचे आहे मी त्यांना सांगितले आता झोपायची वेळ आहे ते भेटणार नाही. तुम्ही विषय काय ते सांगा मी त्यांना निरोप देतो
जावडेकर म्हणाले मुख्यमंत्रीपदाचा विषय झाला आहे, मी विचारले काय झाले तेव्हा जावडेकरांनी सांगितले की सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचे ठरवले आहे हे बाळासाहेबांना सांगायचे आहे. मी काकांना आवाज दिला तेव्हा बाळासाहेबांना सुरेश जैन यांचे नाव घेऊन जावडेकर आल्याचे सांगताच बाळासाहेबांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठी होईल दुसरा कुणी होणार नाही.
Maharashtra is bigger than any controversy, no one should look at Maharashtra with crazy, crooked eyes, warns Raj Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी