Mahayuti Governments : महायुती सरकारची शेतकऱ्यांना भेट, एक वर्षासाठी कर्जवसुलीला स्थगिती

Mahayuti Governments : महायुती सरकारची शेतकऱ्यांना भेट, एक वर्षासाठी कर्जवसुलीला स्थगिती

Mahayuti Governments

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Mahayuti Governments  कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक झाले असताना महायुती सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्षासाठी स्थगीती देण्यात आली आहे. सरकारने बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जाची वसूली न करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना यंदा कर्ज भरावे लागणार नाही. यामुळे शेतकऱ्यांवर येणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.Mahayuti Governments

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांना कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी कर्ज भरावे लागणार आहे. अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे पिचलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाला लाभ मिळणार आहे.Mahayuti Governments



ही स्थगिती सर्व प्रकारच्या कर्जांवर लागू राहणार असून राज्य सरकारने सहकारी कर्जांचे पुनर्गठन करण्याचेही आदेश तत्काळ लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पिकांचे, पशुधनाचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मराठवाड्यात तर अतिवृष्टीमुळे परिस्थिती आणखी भीषण होती आणि नुकसानीच्या पार्श्वभूमीवरही काही बँकांकडून कर्जवसुलीचा तगादा लावल्या जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या होत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत शेतकरी नेते बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले आणि रविकांत तुपकर यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली हाेती. या बैठकीत कर्जमाफीचा विषय गृहीत धरून सविस्तर चर्चा झाली आणि 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले. यासाठी अभ्यास करून निर्णय अंतिम करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पूर्ण वर्षासाठी कर्जवसुली रोखल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पूर, दुष्काळ आणि बाजारातील अनिश्चितता यांच्या संयुक्त परिणामामुळे अडचणीत सापडलेल्या लाखो शेतकऱ्यांना सावरण्याची संधी हा निर्णय देणार आहे.

काही दिवसांपूर्वी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारने त्यांच्याशी चर्चा करून 30 जून 2026 ची कर्जमाफीसाठी डेडलाईन देण्यात आली आहे. 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. सरकारच्या या निर्णयावर बच्चू कडू यांनी समाधान व्यक्त करत आंदोलन थांबवले होते. बच्चू कडू यांच्या आंदोलनात राज्यभरातील शेतकरी नेते सहभागी झाले होते, तसेच हजारोंच्या संख्येने शेतकरीही सामील झाले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता.

Mahayuti Governments Gift to Farmers, Suspends Loan Recovery for One Year

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023