बच्चू कडूंच्या आंदोलनात मनोज जरांगे सहभागी, म्हणाले शेतकऱ्यांचे मुद्दे मी शिकत आहे.

बच्चू कडूंच्या आंदोलनात मनोज जरांगे सहभागी, म्हणाले शेतकऱ्यांचे मुद्दे मी शिकत आहे.

Manoj Jarange

विशेष प्रतिनिधी

नागपूर : बच्चू कडूंच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात मराठा आंदोलक मनोज जरांगे सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांचे मुद्दे मी शिकत आहे. सरकारने काल आंदोलनावर डाव टाकला म्हणून मी बाहेर पडलो आणि आंदोलनात सहभागी झालो असे ते म्हणाले. Manoj Jarange

शेतकरी आणि प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आंदोलकांनी नागपूर- हैदराबाद मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. ज्यानंतर आंदोलक शेतकरी नेते आणि सरकारचे प्रतिनिधी राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर यांच्या सुमारे दीड तास खापरी जवळ महामार्गावरच चर्चा झाली. त्यानंतर आंदोलन सुरू ठेवून शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळ मुंबईला मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा करणार आहे. मुंबईतील महत्त्वाच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर शुक्रवारी थेट ‘रेल रोको’चा इशाराही बच्चू कडू यांनी दिला. दरम्यानमराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट दिली Manoj Jarange

मनोज जरांगे पाटील म्हणाले, शेतकऱ्याचा पुत्र म्हणून मी आंदोनात सहभागी झालो आहे. आंदोलनाचा मुळ गाभा आंदोलक असतो हे विसरु नका. आंदोलकांनी नेत्याची भूमीका नीट ऐकून घ्यावी. आपल्याला षडयंत्र डावाला प्रतिडावानेच उत्तर द्यावे लागणार आहे. सरकारने काल आंदोलनावर डाव टाकला म्हणून मी बाहेर पडलो
आंदोलन कसे कराययचे तो सल्ला मी देऊ शकत नाही, सध्या शेतकऱ्यांचे मुद्दे मी शिकत आहे. पहिल्याच दिवशी सरकार असा डाव टाकत असेल तर आंदोलनाला 100 टक्के साथ असणार आहे. सरकारने 70 वर्षात शेतकऱ्यांचे चांगले कले नाही. सरकार कितीही डाव टाकत असेल तर आंदोलन यशस्वी करणे गरजेचे आहे, अस म्हणत त्यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

दरम्यान, आज गुरुवारी बच्चू कडू हे मुख्यमंत्र्यांसोबत मंत्र्यांशी चर्चा करणार आहे. मुंबईत बच्चू कडूंच्या आंदोलनाबाबत उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत सर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाले पाहिजेत, असे कडू यांनी सांगितले असले तरी आज सकारात्मक चर्चा झाली नाही तर ते पुढे काय निर्णय घेणार, याबाबत सुद्धा बच्चू कडू यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Manoj Jarange participates in Bachchu Kadu’s protest

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023