विशेष प्रतिनिधी
बीड : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी स्तुतीसुमने उधळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे .
मस्साजोगच्या ग्रामस्थांचे आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली. .
जरांगे म्हणाले की, सरपंच देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील तपासाबाबत प्रत्येक मागणीसाठी आंदोलन करावे लागत असेल तर सरकार म्हणून तुम्ही काय केलं. देशमुख कुटुंबीयांनी आंदोलन केल्यामुळेच आतापर्यंत 9 आरोपींना तुरुंगात टाकलं. पण सरकार म्हणून तुम्ही काय केलं? खरं तर अशावेळेला राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार पाहिजे होतं. सर्वांना आत टाकलं असतं आणि तंगड्या धरून आपटले असतं. ही काय तिरस्कारासारखी वागणूक आहे. देशमुख कुटुंबाला आज उपोषणाला बसावं लागतं आहे. मुख्यमंत्र्यांना देशमुख कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला की नाही? देशमुख कुटुंब आजही प्रतिसाद देत आहेत. पण त्यांना (देवेंद्र फडणवीस) एकदाही माया दया फुटत नाही. सरकार सोबत असून देखील न्याय नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशमुख कुटुंबीयांच्या भेटीला आले नाहीत, असा प्रश्न विचारला असता मनोज जरांगे म्हणाले की, ते आले किंवा नाही आले, हा त्यांचा विषय आहे. त्याबाबत मला काही माहित नाही. परंतु बाकीचे कुणीच येऊन गेले नाहीत, त्यांचं काय? फडणवीस पण आले नाहीत ना? त्यांना आणण्यासाठी देशमुख कुटुंबीयांनी काय हेलिकॉप्टर लावायचं होतं का? इकडे काय मुसळधार पाऊस आहे का? इकडचे सगळे पूल वाहून गेले आहे का? मी कोणाशी बरोबरी करत नाही, मी फरक सांगतो आहे. फडणवीसांचा द्वेष किंवा शिंदे चांगले, असं काहीही नाही. मी फक्त दोघांच्या कामातील फरक सांगतोय, असे मनोज जरांगे म्हणाले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्याचं काही चालू दिलं नाही, असा आरोप करून जरांगे म्हणाले,आता ते उपमुख्यमंत्री आहेत. खरं तर आमच्या दोन मागण्यांना आता दोन महिने होतील. सुरुवातीला मराठा आरक्षणाच्या आठ मागण्या होत्या. तेव्हा म्हणाले चार करतो. आता चारपैकी दोन वर आले. पण त्याही मागण्या पूर्ण होताना दिसत नाही. कोणत्याच गोष्टीचा काही मेळ नाही. यातून लक्षात येतं की, गरिबांचा सरकारला किती तिरस्कार आहे,
Manoj Jarange praised Eknath Shinde, said if Shinde was Chief Minister…
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…