स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल

स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षणाच्या तिढ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांनी निशाणा साधला आहे. स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं. कधीपर्यंत भाजपची री ओढणार आहात? असा सवाल मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना केला आहे. Manoj Jarange

मनोज जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना जबाबदार धरले हाेते. मराठा आरक्षणाबाबतची सगळी उत्तरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देतील. मनोज जरांगे पुन्हा का आंदोलनाला बसले, हे देखील त्यांनाच विचारा, असे राज ठाकरे म्हणाले हाेते. त्यावर उत्तर देताना मनाेज जरांगे म्हणाले, तुम्हाला आम्ही काही विचारले का? मग तुम्ही आम्हाला का सल्ला देताय? तुम्ही भाजपकडे गेला, पाठिंबा दिला आणि परत काढून घेतलात. आम्ही 11 आमदार दिले तेव्हा आम्ही म्हटले का, मराठवाड्यात येऊ नका? मग तुम्हीही आम्हाला कशाला विचारताय?”

केव्हापर्यंत भाजपची री ओढणार? स्वतःच्या ठाकरे ब्रँडचे नुकसान करून घेतलेत, अशी टीका करत जरांगे म्हणाले, स्वतःचं पोरगं निवडणुकीत पडलं. हुशार राजकारणी आहात, डोके लावून वागा; नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील. त्यांच्या घरी जेवण झाले की तुमचा कार्यक्रम ठरतो, हे लोक समजतात. पण गरीब मराठ्यांना सगळे कळते. निवडणुका लागल्या की तुम्हाला जवळ धरतात, मतदान झाले की दूर लोटून देतात.

आता ठाकरे बंधू एकत्र आलेत, म्हणून ते भयभीत झालेत. त्यामुळे तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांच्या घरी जाऊन जेवायला गेलात. तुम्हाला वाटते तुम्ही फार हुशार आहात, पण त्यामुळे तुमचा पक्ष खड्ड्यात गेलाय. आता मराठा समाज तुम्हाला समजून घेतो आहे, अशी टीकाही जरांगे यांनी केली.

Manoj Jarange Questions Raj Thackeray

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023