विशेष प्रतिनिधी
मुंबई : Manoj Jarange ऐन गणेशोत्सवात मुंबईकरांना वेठीस धरून मराठा आरक्षण आंदोलन चालविणारे मनोज जरांगे शरद पवार भेटीला येणार म्हटल्याबरोबर ताठ झाले. त्यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणे साधले.Manoj Jarange
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांचा इंधनपुरवठा आहे, हे सत्य लपून राहिले नाही. दोन्ही पक्षांच्या खासदारांनी आणि आमदारांनी मनोज जरांगे यांना भेटून पाठिंबा जाहीर केला. पण मनोज जरांगे यांचे “राजकीय मित्र” राजेश टोपे मात्र त्यांच्या भेटीला पोहोचले नव्हते. ते काल रात्री मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचले. शरद पवार तुम्हाला भेटायला येणार आहेत असा निरोप राजेश टोपे यांनी त्यांना दिला. त्याबरोबर मनोज जरांगे आज सकाळी ताठ झाले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर राज ठाकरे यांना सुद्धा अरे तुरे मध्ये संबोधून दोघांवर निशाणा साधला.Manoj Jarange
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाचे समाधान एकनाथ शिंदे यांनी केले होते. मग ते त्याच कारणासाठी परत मुंबईला का आले??, याचे उत्तर एकटे एकनाथ शिंदे देऊ शकतील, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. त्या वक्तव्यावर मनोज जरांगे चिडले आणि त्यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर अरे तुरेच्या भाषेत निशाणा साधला.
– राज ठाकरे कुचक्या कानाचा
राज ठाकरे फक्त मानाचा भुकेला आहे. देवेंद्र फडणवीसने त्याचा फक्त चहा पिऊन कार्यक्रम केला. त्याचा पक्ष बुडवला तरी त्याच्या मुलाला पाडले, तरी त्याला काही वाटले नाही. ग्रामीण भाषेत याला कुचक्या कानाचा म्हणतात. राज ठाकरे कुचक्या कानाचा आहे, अशी उर्मट भाषा मनोज जरांगे यांनी वापरली. दोघे भाऊ चांगले आहेत. ठाकरे ब्रँड पण चांगला आहे. पण फडणवीसने राज ठाकरेची गेम केली. त्याचे 13 आमदार निवडून आले ते का पळून गेले आम्ही विचारले नाही. त्याची सासरवाडी नाशिकची आहे पण तो नाशिकला 50 वेळा का जातो हे आम्ही विचारले नाही. त्याने मराठ्यांच्या प्रश्नात पडायचे कारण नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
Manoj Jarange stiffened as soon as Sharad Pawar said he would reach for the meeting; Targeted Raj Thackeray after Fadnavis in harsh language!!
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा