विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठी भाषेचा आदर आवश्यक आहे. पण दुसरीकडे काही राजकीय पक्षांकडून मराठी-हिंदी वाद मुद्दाम भडकवला जात असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे. Abu Azmi
राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठी – हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर बोलताना अबू आझमी म्हणाले की, मराठी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे. परंतु केवळ मराठी येत नाही म्हणून कोणालाही मारणे, ही प्रवृत्ती चुकीची आहे. महाराष्ट्राने देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून आलेल्या लोकांना पोटभर अन्न दिले आहे, त्यांना मोठे केले आहे. हे विसरू नये.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
उत्तर भारतीय असोत वा राजस्थानमधून आलेले लोक असोत, महाराष्ट्रात येऊन कष्ट करतात, प्रगती करतात. त्यांच्यावर हल्ले होणे हे अत्यंत निंदनीय आहे. अशा घटनांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे.”
काही राजकीय पक्ष जाणूनबुजून मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण करत आहेत. हे सगळे मतांसाठी सुरू आहे असा आरोप करूनअबू आझमी म्हणाले की, मराठी माणसाच्या नावावर निवडणुकीत फायदा घेण्याचा हा प्रयत्न आहे. हे राजकारण थांबले पाहिजे. जो खरोखर मराठी माणसांचा सन्मान करतो, तो कुठल्याही परप्रांतीयाला मारहाण करणार नाही.
अबू आझमी म्हणाले की, अपने गली में कुत्ता भी शेर होता है हे म्हणणे लागू होते, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुणालाही माराल. असे वागणे म्हणजे गुन्हा आहे. तुम्ही जर गुन्हा केला, तर त्याला विरोध झालाच पाहिजे.
Marathi-Hindi dispute is being deliberately incited for votes, alleges Abu Azmi
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी