विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mukesh Ambani लोक म्हणतात की मीडिया आणि मनोरंजन भारताची सॉफ्ट पॉवर आहे. पण मी म्हणतो, हीच भारताची रिअल पॉवर आहे, असे प्रतिपादन रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केले.Mukesh Ambani
भारताला जागतिक सर्जनशीलतेचं केंद्र बनवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES 2025) चा भव्य शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे झाला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकारातून आयोजित ही चार दिवसांची परिषद (१–४ मे) १०० हून अधिक देशांतील प्रतिनिधींना एकत्र आणत आहे.
मुकेश अंबानी यांनी दोन महत्त्वाच्या परिवर्तनांचा उल्लेख केला. एक म्हणजे जगातील भू-अर्थशास्त्रीय बदल, ज्यामध्ये ग्लोबल साउथचा वाढता प्रभाव आणि दुसरं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानामुळे कंटेंट निर्मितीपासून वितरणापर्यंत सारा अनुभव बदलणं. ते म्हणाले, भारत तीन महत्त्वाच्या स्तंभांवर सर्जनशील क्रांतीचं नेतृत्व करू शकतो – कंटेंटची ताकद, युवा लोकसंख्या आणि तंत्रज्ञानातील आघाडी. भारताची डिजिटल क्रांती ही आकांक्षा, महत्त्वाकांक्षा आणि परिवर्तनाची गोष्ट आहे.सध्या $२८ अब्ज डॉलरच्या भारतीय मनोरंजन क्षेत्राची बाजारपेठ योग्य धोरणे व गुंतवणुकीच्या साहाय्याने दशकामध्ये $१०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अंबानी म्हणाले, “भारत हे केवळ एक राष्ट्र नसून कथा सांगणारी संस्कृती आहे. आपली पुराणे, महाकाव्ये, आणि सांस्कृतिक परंपरा या सर्वांमध्ये कथा सांगण्याची एक अखंड परंपरा आहे. ‘Content is King’ हे तत्त्व जगभरात आजही तितकेच प्रभावी आहे, असे ते म्हणाले.
या ऐतिहासिक शिखर परिषदेच्या उद्घाटनावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी “ऑरेंज इकॉनॉमी” म्हणजेच सामग्री, सर्जनशीलता आणि संस्कृतीच्या जोरावर भारताच्या नव्या आर्थिक शक्तीची संकल्पना मांडली. ते म्हणाले, आज जग कथा शोधत आहे, आणि भारताकडे हजारो वर्षांची कथा सांगण्याची परंपरा आहे. ही वेळ आहे ‘Create in India, Create for the World’ म्हणण्याची,” असं सांगत त्यांनी Skill India, Startup India यांसारख्या उपक्रमांद्वारे युवा सर्जकांना प्रोत्साहन दिलं.
“WAVES ही केवळ एक संज्ञा नाही, ही एक लाट आहे. चित्रपट, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन आणि कथा या लाटेवर स्वार होऊन जगभर पोहोचत आहेत,” असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारत हे केवळ एक राष्ट्र नाही, तर एक संस्कृती आहे जिथे कथा सांगणं ही जीवनशैली आहे. आपल्या महाकाव्यांपासून लोककथांपर्यंत, आपली परंपरा ही कथाकथनाची आहे. Content is king—and good stories always sell. ही शाश्वत गोष्टच जागतिक मनोरंजनाचा पाया ठरते, असे पंतप्रधानांनी सांगितले.
Media and entertainment are the real strength of India, believes Mukesh Ambani
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती