विशेष प्रतिनिधी
ठाणे : Avinash Jadhav मीरा-भाईंदर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारतच, संभाव्य कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करत अनेक प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले आहे. पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील, माजी नगरसेवक प्रफुल पाटील, तसेच वसई-विरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर यांच्यासह शेकडो मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या नजरकैदेत आहेत.Avinash Jadhav
रविवारी (८ जुलै) मीरा-भाईंदरमध्ये मनसेकडून आयोजित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी आंदोलनास पूर्वपरवानगी नाकारली होती. मात्र, मनसेने मोर्चासाठी जोरदार तयारी केली होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, या भीतीने पोलिसांनी तातडीने कारवाई करत रात्रीपासूनच नेत्यांच्या घरांवर धाड टाकून अनेकांना ताब्यात घेतले.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
विशेष म्हणजे, वसई, विरार, आणि नालासोपारा पोलिसांनी पहाटे ३ वाजता छापे टाकून स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना थेट त्यांच्या घरातून उचलले. संदीप देशपांडे व माजी आमदार राजू पाटील यांच्यावरही कारवाई करत त्यांना मीरा-भाईंदर परिसरात येण्यास मज्जाव करणारी नोटीस बजावण्यात आली. याशिवाय कलम १६३ अंतर्गत सर्व नेत्यांना नोटिसा देत, “सार्वजनिक शांततेस धोका निर्माण होण्याची शक्यता” असल्याचे कारण नमूद केले आहे.
संदीप देशपांडे यांच्या नोटीसीमध्ये त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत १४ गुन्हे दाखल असल्याचे नमूद करत, त्यांची उपस्थिती परिसरात तणाव वाढवू शकते असा उल्लेख करण्यात आला आहे. भाषिक वाद, जनतेच्या जीवित वा मालमत्तेस धोका निर्माण होण्याची भीती आणि शांतता भंगाची शक्यता हेही नोटिसांमध्ये म्हटले आहे.
मीरा-भाईंदरमध्ये एका गुजराती व्यावसायिकाला मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्याला उत्तर म्हणून मनसेने मोर्चाची हाक दिली होती. मराठी आणि हिंदी भाषिकांमधील वादाची पार्श्वभूमी लक्षात घेता, पोलिसांनी हा मोर्चा रोखण्याचा निर्णय घेतला.
मनसेने मात्र पोलिसांच्या या कारवाईचा तीव्र निषेध करत, “लोकशाहीमध्ये आंदोलने हा आमचा हक्क आहे. पोलिसांनी आमच्या नेतृत्वाला रोखण्याचा हा प्रयत्न म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखा आहे,” असे म्हटले आहे.
MNS leaders arrested before the march; Hundreds of activists including Avinash Jadhav, Jayendra Patil, Praful Patil detained
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी