विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत असताना राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा – निवडणूक कधी होणार? सध्या महानगरपालिकेचा कारभार प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून चालवला जात असून, निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसल्यामुळे नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मुंबईतील समस्यांवर मोकळेपणाने चर्चा घडवण्यासाठी “प्रतिसभागृह” या अभिनव संकल्पनेची घोषणा केली आहे.
मनसेने या उपक्रमाची संकल्पना मांडताना स्पष्ट केलं की, मुंबई महानगरपालिका ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोन चाकांवर चालते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी हे चाक बंद असल्याने अनेक समस्या प्रलंबित आहेत. नागरिकांच्या प्रश्नांवर खुल्या चर्चेची गरज असून, त्यातून प्रशासनालाही योग्य दिशा मिळेल, असा मनसेचा विश्वास आहे.
या प्रतिसभागृहात प्रति महापौराचीही नियुक्ती करण्यात येणार असून, विविध पक्षांचे नेते व स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेना (शिंदे गट) मंत्री उदय सामंत, शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे आणि राखी जाधव, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, समाजवादी पक्षाचे सईसभाई शेख यांच्यासह इतर पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आले आहे.
मनसेने म्हटले की, हा कार्यक्रम राजकीय अभिनिवेश न ठेवता नागरिकांच्या समस्यांवर केंद्रित असेल. विविध पक्षांनी एकत्र येऊन मुंबईच्या प्रश्नांवर चर्चा करावी, मार्ग शोधावा आणि महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेला योग्य दिशेने गती द्यावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
MNS’s ‘reply hall’ on Mumbai Municipal Corporation issues, invites many leaders including Aditya Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत