विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात त्रिभाषा सुत्राच्या माध्यमातून कथित हिंदी सक्ती 5 जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात गणेश मंडळे आणि दहीहंडी पथकांनी सहभागी व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून पाच जुलै रोजी आता एकत्र मोर्चा निघणार आहे. यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्ष देखील सहभागी होणार आहेत. इतर अनेक छोट्या मोठ्या पक्षांनी देखील या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे. या मोर्चात राज्यातील सर्व साहित्यिक, कलाकार, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांनी सहभागी व्हावे, असा आवाहन देखील राज ठाकरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या मोर्चामध्ये मराठी कलाकार, साहित्यिक, शाळेतील शिक्षक, राजकीय नेते सर्व सहभागी होणार आहेत. आता या मोर्चा मुंबईतील गणेश मंडळे, दहीहंडी मंडळे, नवरात्र उत्सव समिती यांनी देखील सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येत आहे.
या मोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने विविध मंडळांना आवाहन करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईतील दहीहंडी पथके, गणेश मंडळे, नवरात्र उत्सव मंडळे अशा विविध मंडळांना मोर्चात सहभागी होण्याचा आवाहन करण्यात येणार आहे. त्यासाठी विभाग रचनेनुसार विविध मंडळांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी बैठका देखील घेणार आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात वरळी येथे मंडळांसोबत एक बैठक होणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
राज व उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावरून एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे सकारात्मक चित्र आता कॅडर पातळीवर दिसून येत आहे. उद्धव यांनी राज ठाकरे यांच्या 5 जुलैच्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेताच मनसे नेते संदीप देशपांडे व ठाकरे गटाचे आमदार वरूण सरदेसाई यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये एकमेकांची भेट घेतली.
खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी आपला पक्ष मनसेच्या मोर्चात सहभागी होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर दिवसभर वेगवान घडामोडी घडल्या. प्रमुख नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनसे व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही एकमेकांच्या भेटी घेण्यासाठी पुढाकार घेतला.
MNS will use the power of Ganesh Mandals and Dahi Handi teams for the march
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी