विशेष प्रतिनिधी
मुंबई :मीरा रोड येथील एका रेस्टॉरंटमधील अमराठी दुकानदाराला मराठीतून संवाद न साधल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवरून बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीने ( Actor Ranvir Shore ) तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी रणवीरने मनसे कार्यकर्त्यांची कृती “लज्जास्पद आणि घृणास्पद” असल्याचं सांगत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
रणवीर शौरीने ट्विटरवर (X) या घटनेचा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “हे घृणास्पद आहे. राक्षस मोकाट फिरत आहेत. ते केवळ लक्ष वेधण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी हे कृत्य करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचं काय? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष द्यावं.”
This is sickening. Monsters on the loose, looking for attention and political relevance. Where’s L&O, @CMOMaharashtra @Dev_Fadnavis? https://t.co/sMYUMcN1la
— Ranvir Shorey (@RanvirShorey) July 2, 2025
त्याच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. काहींनी रणवीरच्या भूमिकेचं समर्थन केलं, तर काहींनी त्याला महाराष्ट्रातील वास्तवाची जाणीव करून देत, “तू किती वर्षांपासून इथे राहतोस? मराठी शिकण्यासाठी प्रयत्न का नाही केलास?” असा प्रतिप्रश्न केला. यावर रणवीरनेही प्रत्युत्तर देत लिहिले आहे की मी अनोळखी लोकांना प्रत्युत्तर देत नाही, जे द्वेष पसरवतात. आणि जर तुम्हाला वाटत असेल की लोकांना मारहाण करून त्यांना भाषा शिकवता येते, तर तुम्ही अतिशय चुकीच्या समजुतीत आहात. जर तुम्हाला भाषेच्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचं असेल, तर गरीब दुकानदारांना मारहाण करण्याऐवजी अधिक रचनात्मक मार्ग निवडा. राजकारणासाठी हिंसेचा वापर हा समाजासाठी धोकादायक आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं की, रेस्टॉरंटचा अमराठी मालक मनसे कार्यकर्त्यांना सांगतो, “मराठी शिकण्याची तयारी आहे, मला कुणीतरी शिकवा.” मात्र तरीही मनसेचे कार्यकर्ते त्याच्यावर चिडून “हा महाराष्ट्र आहे, तुला मराठीतच बोलावं लागेल,” असं म्हणत त्याला हिंदीत बजावतात आणि त्यानंतर त्याच्यावर हात उचलतात. विशेष म्हणजे हे सर्व संवाद मनसे कार्यकर्त्यांनी स्वतः हिंदी भाषेतच केले आहेत.
Monsters are roaming free! Actor Ranvir Shorey criticizes MNS workers for beating up Amrathi shopkeeper
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी