Bhai Jagtap : मुंबई काँग्रेसचा यूटर्न! भाई जगताप म्हणाले, स्वबळावर लढवणुकीची इच्छा आहे, पण अंतिम निर्णय हायकमांडच घेणार

Bhai Jagtap : मुंबई काँग्रेसचा यूटर्न! भाई जगताप म्हणाले, स्वबळावर लढवणुकीची इच्छा आहे, पण अंतिम निर्णय हायकमांडच घेणार

Bhai Jagtap

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Bhai Jagtap  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, काँग्रेसच्या भूमिकेवरून राजकीय चर्चांना जोर आला आहे.Bhai Jagtap

अलीकडेच काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या वक्तव्याने महाविकास आघाडीत मतभेद असल्याचा संदेश गेला. मात्र, आता जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट करत थोडी माघार घेतली आहे.Bhai Jagtap



भाई जगताप म्हणाले, “मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना मी नेहमीच स्वबळाची भूमिका घेतली होती. माझ्या मते, अनेक वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर मिरवणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळायला हवी. त्यामुळे ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. मात्र, अंतिम निर्णय हायकमांडच घेईल आणि त्याचा आम्ही आदर करू.”

ते पुढे म्हणाले, “राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या समोर मी आणि काही सदस्यांनी स्वबळावर लढण्याची भूमिका मांडली होती. पण ही माझी वैयक्तिक इच्छा आहे, पक्षाचे हायकमांड जे ठरवतील तीच भूमिका अंतिम असेल.”

यापूर्वी भाई जगताप यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले होते की, “आम्ही उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्यासोबत लढणार नाही.” या विधानाने महाविकास आघाडीत हलचल निर्माण झाली होती. पण आता त्यांनी “हायकमांड जे ठरवेल ते मान्य असेल” असे सांगत आपली भूमिका मवाळ केली आहे.

राज्याच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आले असताना, काँग्रेसची स्वतंत्र भूमिका महत्त्वाची ठरत आहे. मात्र, भाई जगताप यांच्या या नव्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा सूर पुन्हा एकदा ‘आघाडीधार्जिणा’ झाल्याचं चित्र आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, “जगताप यांचा हा यूटर्न म्हणजे काँग्रेसमध्ये उच्च पातळीवर समन्वय साधण्याचा प्रयत्न” आहे. आता हायकमांड कोणती भूमिका घेते आणि काँग्रेस अखेर महाविकास आघाडीसोबत राहते की स्वतंत्र लढत देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mumbai Congress’s U-turn! Bhai Jagtap said, he wants to contest on his own, but the high command will take the final decision

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023