विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nana Patole राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेले आहे. मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत पाणी पोहोचणं हे फक्त पावसाचं नव्हे, तर सरकारच्या उदासिनतेचं दर्शन आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे.Nana Patole
निसर्ग स्वतःच सरकारला सावध करत आहे. महायुती सरकार हे भ्रष्टाचारी असून फक्त एका पाण्यातच मुंबई बुडते. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील सरकार मुंबई स्वच्छ करू शकत नाही, चांगले रस्ते करू शकत नाही, ड्रेनेज सिस्टिम सुधारू शकत नाही. नद्यांमधील कचरा काढण्याच्या बहाण्याने कोट्यवधी रुपये लुटले जातात हे विदारक दृश्य आहे. हा सरकारचा बेशिस्त कारभार आहे असा हल्लाबोल करत नाना पटोले म्हणाले, अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, धान आणि फळबागांचे भयानक नुकसान झालं आहे. मात्र सरकारकडून फक्त आकडेवारी वाचली जाते, मदतीचा एक थेंबही शेतकऱ्याच्या डोळ्यांतले अश्रू थोपवू शकलेला नाही. मागच्या वर्षीच्या नुकसानीची भरपाई अजूनही हवेत लोंबकळतेय, आणि शेतकरी मात्र आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे.
शेतकऱ्याला निवडणुकांच्या वेळी “राजा” म्हणणारेच आज त्याच्या दुःखाकडे पाठ फिरवत आहेत आणि म्हणूनच, मंत्रालय पाण्याखाली जाणं ही नुसती नैसर्गिक आपत्ती नाही तर ती एक चेतावनी आहे
गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारने घेतल्या नाहीत. माननीय सुप्रीम कोर्टाला सरकारला चार महिन्यात निवडणुका घ्यायला सांगावे लागते तरीही या सरकारची निवडणूक घेण्याची इच्छा नाही. प्रशासक आणि सरकारच्या माध्यमातून जनतेची लूट सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार अनेक वर्षं पुण्याचे पालकमंत्री आहेत तरीही शहरात असा पूर येतो की नद्या रस्त्यांवरून वाहतात, हे निष्काळजी नियोजन नाही, तर बिल्डर लॉबीसोबतच्या संगनमताचं फलित आहे. यांना जनतेशी काही देणंघेणं नाही, यामुळेच आज राज्यात सर्वत्र घाणीचे आणि पुराचे साम्राज्य पहायला मिळत आहे. आज एकीकडे पुराने राज्याला वेढले आहे, एकीकडे शेतकऱ्यांची पिके उद्धवस्त झाली आहे आणि दुसरीकडे अमित शहांच्या दौऱ्याची जय्यत तयारी नांदेड मध्ये सुरू आहे. याचाच अर्थ यांना जनतेच्या मतावर ऐशोआराम करायचा आहे असा आरोप पटोले यांनी केला आहे.
Mumbai is in water due to the indiscipline of the Mahayuti government, alleges Nana Patole
महत्वाच्या बातम्या
- Economy : अर्थव्यवस्थेत भारताने जपानला टाकलं मागे, आता जर्मनीची वेळ
- Jyoti Malhotras : ज्योती मल्होत्राच्या फोनवरून मोठा खुलासा, पाकिस्तानी युट्यूबरसोबत करत होती काम!
- Lalu Prasad Yadav : बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी मोठी कारवाई
- Mysore Pak : आता ‘म्हैसूरपाक’ नाही ‘म्हैसूर श्री’ म्हणायचं