विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mumbai Municipal Corporation मुंबईमध्ये शहरातील कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले होते. त्यानंतर जैन धर्मीयांनी याबाबत संताप व्यक्त करत आंदोलन केले होते. तसेच, कबुतरांना खायला खाद्य घालण्यासाठी पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी मुंबई महापालिकेकडे केली होती. त्यांनतर या वादावर महापालिकेने एक तोडगा काढल्याचे समोर आले आहे. जैन धर्मियांच्या मागणीनंतर मुंबई महापालिकेने जी दक्षिण विभागातील वरळी जलाशय, के पश्चिम विभागात खारफुटी परिसर, लोखंडवाला बॅक रोड, वेसावे एसटीपी प्रकल्पाजवळ, अंधेरी पश्चिम तसेच टी विभागात खाडीकडील परिसर, जुना ऐरोली – मुलुंड जकात नाका, ऐरोली – मुलुंड जोड रस्ता, मुलुंड (पूर्व) आणि आर मध्य विभागात गोराई मैदान, बोरिवली (पश्चिम) या 4 ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीने दाणे टाकण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे जैन धर्मियांना कबुतरांच्या प्रकरणात दिलासा मिळणार आहे.Mumbai Municipal Corporation
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने मुंबई महापालिकेने दादर आणि जोपीओ आदी ठिकाणी अस्तित्वात असलेले कबुतरेखाने कारवाई करून बंद करून टाकले. त्यामुळे जैन धर्मियांनी पालिकेच्या कारवाईच्या विरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला होता. तसेच, दादर येथील बंदिस्त करण्यात आलेला कबुतरखाना हल्लाबोल करत खुला केला होता. मात्र त्यानंतर न्यायलयाने देखील पुन्हा कबुतरेखाने बंदिस्त करण्याचे आदेश देत जैन धर्मियांना चांगलेच फटकारले होते. त्यानंतरही जैन धर्मियांनी काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन मुंबईत नागरिकांना त्रास होणार नाही, अशी ठिकाणे कबुतरांना दाणे टाकण्यासाठी शोधण्यात यावी, अशी मागणी केली होती.Mumbai Municipal Corporation
अखेर मुंबई महापालिकेने 4 ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीने (Control Feeding) दाणे टाकण्यास तात्पुरती परवानगी दिली आहे. पण, सकाळी 7 ते 9 या दोन तासांच्या वेळेतच कबुतरांना खाद्य टाकता येणार आहे. न्यायालयाच्या अधीन राहून सदर निर्णय घेण्यात आला असून या अंतरिम निर्णयानुसार, कबुतरांना दाणे घालण्यासाठी वरळी जलाशय, लोखंडवाला बॅक रोड (अंधेरी पश्चिम), ऐरोली–मुलुंड जोड रस्ता (खाडी परिसर) आणि गोराई मैदान या 4 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी स्वयंसेवी संस्था व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारतील, तेव्हाच त्यांना कबुतरांना दाणे टाकण्याची परवानगी देण्यात येणार आहे. सदर 4 ठिकाणे वगळून सध्या बंद असलेले सर्व कबुतरखाने बंदच राहतील, असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कबुतरांना दाणे खाण्यासाठी घालताना सदर ठिकाणी वाहतूक किंवा पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे, सदर परिसर स्वच्छ ठेवावी लागणार आहे. तसेच, नागरिकांकडून तक्रारी आल्यास त्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, अशी काही बंधने संबंधित संस्थांना घालण्यात आली आहेत. यासाठी संबंधित संस्थांकडून प्रतिज्ञापत्रदेखील घेण्यात येणार आहे. या व्यवस्थापनाच्या समन्वयासाठी संबंधित विभागांचे सहायक आयुक्त हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तसेच, कबुतरखान्यांच्या परिसरात स्वच्छता आणि आरोग्याबाबत जनजागृतीसाठी सूचना फलकही लावले जाणार आहेत, अशी माहिती पालिकेने दिली.
Mumbai Municipal Corporation approves 4 places to feed pigeons
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















