विशेष प्रतिनिधी
मुंबई : House Arrest show उल्लू ॲपवर ‘हाऊस अरेस्ट’ नामक शोमध्ये अश्लीलता प्रसारित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी अभिनेता एजाज खानला नोटीस बजावली. या नोटिशीत खान आणि ज्या उल्लू ॲपवर हा शो प्रसारित झाला होता त्या उल्लू ॲपच्या मालकाला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून त्यांचे जबाब नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.House Arrest show
या शोच्या विरोधात राज्य महिला आयोगाने दखल घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या की, शोमध्ये स्पर्धकांकडून विचारल्या जाणाऱ्या अश्लील प्रश्नांबद्दल अनेक महिलांनी तक्रार केली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या पाेलीस महासंचालकांना कारवाई करण्याचे पत्र लिहिले आहे. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
रूपाली चाकणकर म्हणाल्या, या शोबद्दल आम्हाला अनेक तक्रारी आल्या आहेत ज्यात असे म्हटले आहे की शोमधील स्पर्धकांना अश्लील प्रश्न विचारले जातात आणि अशाच प्रकारच्या कृती करण्यास सांगितले जाते. आम्ही कारवाईसाठी पाेलीस महासंचालक कार्यालयाला पत्र लिहिले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुपाली चाकणकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या ‘हाउस अरेस्ट’ या शोमध्ये होस्ट एजाज खान सहभागी महिला, पुरुषांना अश्लील प्रश्न विचारून आक्षेपार्ह प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगत आहेत. महिलांना अंगावरील कपडे उतरविण्यास सांगून त्यासाठी प्रोत्साहन देत आहेत असे व्हिडियो समाज माध्यमातून समोर येत आहेत. याविषयी जनमानसातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने राज्य महिला आयोगाने याची स्वाधिकारे दखल घेतली आहे. ‘हाऊस अरेस्ट’ या शोचे प्रसारण बंद करावे तसेच भारतीय न्याय संहिता, स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंध कायदा, माहिती प्रसारण कायदा व अनुषंगिक कायद्यान्वये संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना आयोगाने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना दिल्या आहेत.
या शोवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा! एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.
राष्ट्रीय महिला आयाेगानेही या शाेच्या संदर्भात कडक भूमिका घेतली आहे. याबाबत स्वत;हून दखल घेत या शाेाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला नाेटीस बजावली आहे.
Mumbai Police issues notice to actor Ejaz Khan for obscenity in ‘House Arrest’ show
महत्वाच्या बातम्या
- Pakistan पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई; पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी
- Neelam Gorhe : पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना चौकशीचे निर्देश
- Sonu Nigam : सोनू निगमवर गुन्हा दाखल, कन्नडमध्ये गाणे गायचा आग्रह अन् म्हणाला यामुळेच पहलगाममध्ये युद्ध झालं…
- Ajit Pawar : तर अजित पवार, एकनाथ शिंदे हाेऊ शकतात मुख्यमंत्री… संजय राऊत यांचा दावा