विशेष प्रतिनिधी
पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकर यांना दिले पाहिजे. त्यांना जर अशा प्रकारे धमकावले गेले नसते, तर न्यायालयाने याची दखल घेऊन राऊतांना तुरुंगात पाठवले नसते, असा टाेला विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डाॅ. नीलम गाेऱ्हे यांनी मारला आहे. Narkatla Swarg
संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखक, कवी जावेद अख्तर यांच्या हस्ते व राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले. ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. शिवसेना शिंदे गटातील नेत्या नीलम गोऱ्हे यांनी यावरून संजय राऊतांवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, नरकातला स्वर्ग’ संजय राऊतांनी लिहिले.
ते तुरुंगात गेले होते, ते देशसेवेसाठी किंवा कुठल्या आंदोलनात सहभागी झाले होते, म्हणून गेले नव्हते. तर पत्राचाळ प्रकरणात गैरव्यवहार केला, म्हणून तुरुंगात गेले. या प्रकरणातील साक्षीदार आणि जे जबाब देणारे होते, त्यांना शिवीगाळ केला. याही गोष्टी व्हायरल झालेल्या आहेत. पत्राचाळीत गोरगरिब माणसाच्या घरांमध्ये जो माणूस गैरव्यवहार करतो, मनी लाँड्रिंग करतो, त्यांनी हे सगळे दावे करायचे, केंद्रीय गृहमंत्री भेटले, मुख्यमंत्री भेटले, हा प्रकार स्वतःच्या गुन्ह्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा आहे. ही धुळफेक आहे.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, लाडक्या बहिणी या महायुती सरकारवर समाधानीराज्यातील लाडक्या बहिणी या महायुती सरकारवर समाधानी आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. महायुती सरकारच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, पिंक रिक्षा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना अशा योजना राबवल्या जात आहेत.
Narkatla Swarg is credited to Swapna Patkar, Dr. Neelam Gorhe cast to Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर