Devendra Fadnavis : नाशिक आता संरक्षण उत्पादन क्षेत्रातील ‘न्यू मॅग्नेट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : एकेकाळी केवळ धार्मिक आणि कृषी केंद्र म्हणून ओळखले जाणारे नाशिक आता संरक्षण उत्पादन क्षेत्रातील ‘न्यू मॅग्नेट’ बनणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित केल्याने सध्या डिफेन्स कॉरिडॉर जरी उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूत असला तरी त्याहीपेक्षा मोठा संरक्षण कॉरिडॉर नाशिकजवळ विकसित होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

उद्योग संवाद चर्चासत्रात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातील सर्वात मोठ्या संरक्षण कॉरिडॉरची उभारणी नाशिकमध्ये होत आहे. छत्रपती संभाजीनगर त्या कॉरिडॉरचा भाग असेल. पुणे-अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरजवळील प्रस्तावित कॉरिडॉरचा महत्त्वाचा भाग असेल. नाशिकला अंतराळ क्षेत्रातही देशातील ‘नेक्स्ट डेस्टिनेशन’ बनवणार. प्रस्तावित कॉरिडॉरमुळे नाशिकसह इतर भागांच्या स्थानिक अर्थव्यवस्थेलाच नव्हे, तर राष्ट्रीय संरक्षण सामर्थ्यालाही बळ मिळेल,

मुख्यमंत्री म्हणाले, संरक्षण उत्पादन, तंत्रज्ञान कंपन्यांची स्थापना होऊन नाशिकला ‘डिफेन्स हब’ म्हणून ओळख मिळेल. उच्च कुशल व अकुशल कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात थेट व अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्मिती होईल. यामुळेस्थानिक व्यवसायांना चालना, पूरक उद्योगांची वाढ होईल आणि जिल्ह्याच्या जीडीपीत वाढ होईल.

महाराष्ट्रातील औद्योगिक प्रगतीचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले, संरक्षण क्षेत्रात नाशिकची जागतिक स्तरावर ओळख होईल, भविष्यात अधिक गुंतवणूक आकर्षित होईल. गडचिरोली hs एकेकाळी उद्योगशून्य असलेला हा जिल्हा आता नवीन ‘स्टील हब’ बनत आहे, जिथे देशाच्या एक तृतीयांश स्टील उत्पादनाचे लक्ष्य आहे. अमरावती जिल्ह्यात ‘पीएम मित्रा’ उपक्रमांतर्गत भारताची सर्वात स्मार्ट कापड परिसंस्था (टेक्स्टाइल इकोसिस्टिम) विकसित होत आहे, ‘कापसापासून फॅशनपर्यंत’ संपूर्ण मूल्य साखळी तयार केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर हे गेल्या १० वर्षांत भारताचे पहिले स्मार्ट औद्योगिक शहर म्हणून विकसित झाले असून लवकरच ते देशाची ‘ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेइकल) राजधानी’ बनण्याच्या मार्गावर आहे.

वाढवण बंदर हे जेएनपीटीपेक्षा तीनपट मोठे आणि
जगातील पहिल्या १० मोठ्या बंदरांपैकी एक असणारे वाढवण बंदर महाराष्ट्राला लॉजिस्टिक्समध्ये २० वर्षे पुढे नेईल, नाशिकसह किमान २० जिल्ह्यांना थेट जोडेल आणि वाहतूक खर्च कमी करेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र देशाच्या जीडीपीत १४ टक्क्यांहून अधिक योगदान देणारे देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य आहे. २०२४-२५ मध्ये महाराष्ट्राने १.६४ लाख कोटींच्या थेट परकीय गुंतवणुकीसह देशातील एकूण एफडीआयपैकी ४० टक्के वाटा मिळवला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. Devendra Fadnavis

Nashik is now a ‘new magnet’ in the defense manufacturing sector, information from Chief Minister Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या