विशेष प्रतिनिधी
नाशिक : आजारपणाच्या नावाखाली वैद्यकीय रजा घेऊन परदेशात मौजमजा करणे नाशिकच्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त प्र.दा. जगताप यांना चांगलेच भोवले आहे. वरिष्ठांची दिशाभूल करून, देशात युद्धजन्य परिस्थिती असताना आजारपणाच्या नावाखाली विदेशात फिरायला गेलेल्या जगताप यांना दणका देत मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी तातडीने निलंबित केले.
देशातील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आल्या होत्या. शासकीय कामाकरता नाशिकचे मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त जगताप हे इगतपुरी न्यायालयात होते. त्यावेळी त्यांची शुगर कमी झाल्यामुळे अशक्तपणा येऊन चक्कर आली आणि नंतर शुद्धीवर आल्यानंतर दवाखान्यात जावे लागले होते. त्यानंतर नाशिक येथील प्रादेशिक कार्यालयाकडे अर्धा दिवस किरकोळ रजेचा अर्ज सादर करून तब्येत बरी नसल्याचे जगतापांनी भासवले.
मात्र प्रत्यक्षात ते विदेशवारीवर गेल्याचे निष्पन्न झाले. या घटनेत जगताप यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, कर्तव्यात कसूर करणे, कर्त्यव्यावर गैरहजर असणे आणि वरिष्ठांची दिशाभूल केली असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व गंभीर बाबी लक्षात घेऊन मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी कारवाईचा बडगा उचलत जगताप यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.
जगताप हे निलंबित असेपर्यंत मत्स्य व्यवसाय प्रादेशिक उपायुक्त यांच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाहीत असे निलंबनाच्या आदेशात म्हटलं आहे. तसेच त्यांचे मुख्यालय चंद्रपूर हे राहील असेही स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.
Nitesh Rane slams senior government official for having fun abroad by pretending to be ill
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर