Nitesh Rane : खरा शकुनी मामा मातोश्रीवर, राज ठाकरे यांच्या सभेवरून नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Nitesh Rane : खरा शकुनी मामा मातोश्रीवर, राज ठाकरे यांच्या सभेवरून नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Nitesh Rane

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Nitesh Rane माझा भाऊ, माझा भाऊ सुरू आहे तर सामनामध्ये त्यांच्या सभेची बातमी का छापली नाही. इतकेच बंधू प्रेम का? त्यामुळे खरा शकुनी मामा कोण हे तुम्ही समजून घ्या, तो मातोश्रीवर बसलेला आहे, असा हल्लाबोल भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.Nitesh Rane

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल मीरा भाईंदर येथे सभा झाली. या सभेचा संदर्भ देऊन राणे यांनी सवाल केला. ते म्हणाले की, उबाठा इतकी जिहादीच्या प्रेमात आहे की लोकसभेला त्यांचे उमेदवार निवडून आले तेव्हा पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले. विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीत जिहादी नारे कसे दिले गेले. हिरवे झेंडे कसे फडकवले गेले?

मराठी सक्ती तर आमच्या राज्यात आहेच. आम्ही काय मराठी नाही का? पाकिस्तान वरुन आलो आहोत का? पण खरा व्हिलन जो आहे त्याला तुम्ही ओळखा अशी टीका करत राणे म्हणाले , त्यांना आपण प्रश्न विचारला पाहिजे. हिंदी सक्तीला कुणाला जबाबदार धरायचे असेल तर ते उद्धव ठाकरेंना धरा, त्यांच्याविरोधात मोर्चे काढा. हिंदी सक्तीच्या नावाने उद्धव ठाकरे उर्दु सक्तीचा मार्ग मोकळा करत होते.

दुबे चुकले हे आम्ही पण बोलत आहोत, आशिष शेलार यांनी सभागृहात दुबे यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. कुणीही त्यांचे समर्थन करत नाही. पण काल जी सभा घेतली ती मीरा रोडच्या नया नगरमध्ये घ्यायला हवी होती. तिथे चूकूनही कुणी मराठी बोलत नाही. नया नगरचे लोकं डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान पण मानत नाही. कोरोनाच्या काळात या परिसरात शरिया कायदा लागू होता. तेव्हा तिथल्या लोकांनी मास्क लावला नाही, हम कोरोना मानते नही म्हणत होते. तिथे शरिया कायदा लागू आहे. नया नगरच्या गोल टोपी वाल्याचे माझ्याकडे व्हिडिओ आले आहेत की मराठी बोलणार नाही, हात उचलला तर आम्हीही हात उचलू. गरीब हिंदूंना धमक्या देण्यापेक्षा तिथे जाऊन धमक्या द्या ना. त्यांना मराठी शिकवा, असे त्यांनी मनसेला सुनावले.

नीतेश राणे म्हणाले की, हिंदू समाजाला ही लोकं कुत्रा म्हणत आहे. यांच्या तोंडून कधी मराठी निघणार? यांना आम्हाला धमकी देण्याची सुट देण्यात आली आहे का? यांना आपल्या राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवायचे आहे, हिंदू समाजाला संपवायचे आहे, यांना कुणी बोलत नाही. नया नगरमध्ये कुणी मराठी बोलायला लावत नाही. आणि उगाच गरीब हिंदू लोकांना मारायचे. हिंदूंनी आपापसात का भांडायचे, ह्या नया नगर आणि भेंडी बाजारमधील लोकांना आनंद होत रहावा म्हणून का?

राणे म्हणाले, ठाकरे हा ब्रँड बाळासाहेब ठाकरेंच्या नावामुळे होता. यांनी हिरव्या सापांना जवळ करत हा ब्रँड संपवला आणि आता बोलत आहे. यात आमची काय चूकी? त्यांची चूकी आहे. त्यांनी हिंदुत्व सोडले. उबाठामध्ये केवळ आदित्य ठाकरे,उद्धव ठाकरे राहणार आहेत.शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करा तिथे आतंकवादी घडवण्यापेक्षा दुसरे काहीच होत नाही. बुलडाण्यातील मदरशामध्ये यमनचे नागरिक लपले होते. मदरसे बंद करा ते सर्व आतंकवाद्याचे अड्डे बनले आहेत. देशाला जिहाद्याकडून धोका आहे. त्यांना देश इस्लामिक करायचा आहे, त्यामुळे एकत्र राहणे गरजेचे आहे.

Nitesh Rane targets Uddhav Thackeray over Raj Thackeray’s meeting, real Shakuni Mama Matoshree

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023