विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावरून विविध कयास बांधले जात असताना राजकीय चर्चा झाली नाही. राज यांच्या आई कुंदा मावशी यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी उध्दव ठाकरे गेले होते असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.Uddhav Thackeray
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र हे दोन्ही जीआर रद्द झाल्यानंतर विजयी मेळाव्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर एकत्र आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर मातोश्रीवर गेले होते. या भेटीनंतर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब गेले होते. अशातच आज (10 सप्टेंबर) अचानक खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब यांच्यासोबत उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले. या भेटीमागचं कारण आता संजय राऊत यांनी सांगितलं आहे.Uddhav Thackeray
पहिल्यांदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे इतका वेळ एकत्र होते. राजकीय युतीसंदर्भात अधिकृत बोलणी सुरू झालेली आहे का? आणि युतीसंदर्भात अधिकृत घोषणा कधी होणार? असे प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आले. यावर त्यांनी तुम्हाला सत्य ऐकायचं आहे का? असा प्रतिप्रश्न उपस्थित करत म्हटले की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत मी सुद्धा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी होतो. त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता. काहीही राजकारण नव्हतं. सत्य असं आहे की, गणपतीच्या वेळेला उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. तेव्हा राज ठाकरेंच्या आई म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मावशी यांनी निघताना उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की, गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही. त्यामुळे तू (उद्धव ठाकरे) परत ये मला भेटायला. त्यामुळे कुंदा मावशींना भेटायला उद्धव ठाकरे आज राज ठाकरेंच्या घरी गेले होते, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वारंवार भेट होत आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी सविस्तर बोलण्यासाठी ही भेट गरजेची होती, असं म्हटलं जात आहे. यावर राऊत म्हणाले की, दोन्ही नेते आज का भेटले, याबाबत तुम्हाला मी सत्य सांगितलं आहे. तुम्ही त्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असे म्हणत संजय राऊत यांनी जास्त बोलणं टाळलं.
No political discussion, just a chat with Kunda aunt, Sanjay Raut claims about Uddhav Thackeray meeting with Raj
महत्वाच्या बातम्या
- Vice Presidential election : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांना दणका; तब्बल 30 मते फुटली !
- Ayush Komkar murder case : आयुष कोमकर हत्या प्रकरण; बंडू आंदेकरसह 8 जण अटकेत
- double-decker buses : आता पुण्यातही धावणार डबल-डेक्कर बस?
- Pune Commissioner : पुण्यातील रखडलेल्या प्रकल्पांबाबत आयुक्त घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!