Keshav Upadhye : विरोधकांचे मराठीवर पुतना मावशीचे प्रेम, केशव उपाध्ये यांचा आरोप

Keshav Upadhye : विरोधकांचे मराठीवर पुतना मावशीचे प्रेम, केशव उपाध्ये यांचा आरोप

Keshav Upadhye

विशेष प्रतिनिधी

मुंबई: विरोधकांचे मराठीवर पुतना मावशीचे प्रेम असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. मुंबईतील मराठी शाळा बंद पडल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी ठाकरे गटाला प्रश्न विचारले आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुखर उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हिंदीची सक्ती करणाऱ्या अध्यादेशाची होळी करण्याचे आदेश दिलेत. या पार्श्वभूमीवर केशव उपाध्ये यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांचे हे मराठी प्रेम पुतना मावशीच्या प्रेमासारखे असल्याचे त्यांनी म्हटेल आहे. केशव उपाध्ये आपल्या एका पोस्टमध्ये म्हणतात, …हे तर पुतना मावशीचे प्रेम! उद्धव ठाकरे यांनी मराठी सक्तीच्या GR ची होळी करण्याचा आदेश दिला आहे, मराठी सक्ती सांगणाऱ्या जीआरची होळी? हे यांचं मराठी प्रेम? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उर्दू भवनची घोषणा केली, त्यावेळी मराठी शाळांच्या दुरावस्थेची आठवण आली नाही?

मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना वर्षानुवर्षे सत्तेवर होती. मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांची संख्या गेल्या 15 वर्षात 400 वरून 280 पर्यंत खाली आली. याच शाळांतील विद्यार्थी संख्याही लाखांहून 35 हजारांवर आली. काही शाळा बंद कराव्या लागत आहेत. कुठे गेलं उद्धव ठाकरे यांचं मराठी प्रेम? असा सवाल उपाध्ये यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

केशव उपाध्ये यांनी यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही या प्रकरणी निशाणा साधला. सांगण्यासारखा आणखी एक मुद्दा…शरद पवार गटाने 2020 मध्ये हिंदी भाषा जोडो अभियान केले होते. त्याचं उद्धाटन जयंत पाटील यांनी केले होते. आता ते हिंदी विरोधी मोर्चात सहभागी होत आहेत, असे ते म्हणालेत.

Opposition’s love for Marathi is a traitor’s, alleges Keshav Upadhye

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023