विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde पालिका निवडणुकीतील जागा वाटपाच्या वाटाघाटी वेळी पक्षाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.Eknath Shinde
शिंदे म्हणाले, कोण कोणाशी युती करतंय त्याची चिंता करू नका. त्यांची सर्व गणितं आपल्यापकडे आहेत, पालिका निवडणूक जिंकण्याच्या निश्चयाने दसरा मेळाव्यात गर्दी करा. विचार, विकास आणि विश्वास’ या त्रिसूत्रानुसार कामाला लागून मुंबई महापालिका जिंकण्याचा उद्देश ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. महापालिका निवडणुकीची कमान शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांवर असेल, त्यामुळे नेमणुका बाकी असल्यास त्या तातडीने पूर्ण करा.Eknath Shinde
एकनाथ शिंदे म्हणाले, पूर भागात मंत्र्यांचे दौरे झाले. आता खासदार, आमदार, पदाधिकारी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बांधावर जातील. संकट दिसले की मदतीला धावून जा, तो खरा शिवसैनिक. निमंत्रणाची वाट बघू नका. हा पक्ष नोकर आणि मालकाचा नाही, हा पक्ष कार्यकर्त्याचा आह. शिस्त ही शिस्त आहे. ‘शिवसेना’या अक्षरांना गालबोट लागता कामा नये.
Party’s self-respect will not be compromised in seat-sharing negotiations, Eknath Shinde assures workers
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…




















