Aditi Tatkare : बॅनरवरून अजित पवार, सुनेत्रा पवार यांचे फोटो गायब, अदिती तटकरे यांनी व्यक्त केली दिलगिरी

विशेष प्रतिनिधी

अलिबाग: Aditi Tatkare राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षआणि खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात कार्यक्रमाच्या बॅनरवर तटकरे कुटुंबातील सदस्यांचे फोटो झळकले, मात्र राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो नसल्याने टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर, अदिती तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली आहे.Aditi Tatkare

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा भव्य सत्कार सोहळा 27 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याच्या बॅनरवर सर्वात मोठा फोटो सुनील तटकरे यांचा लावण्यात आला आहे, त्यानंतर अदिती तटकरे व अनिकेत तटकरे यांचा फोटो लावण्यात आला. त्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांचा फोटो लावण्यात आला.Aditi Tatkare



मात्र, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार तसेच अजित पवार यांचा फोटो वगळण्यात आला असल्याचे पाहायला मिळाले. यावरून सुनील तटकरे यांच्यावर टीका करण्यात आली होती. यावर आता आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली.

अदिती तटकरे म्हणाल्या, स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम घेतले जातात, असे अनेक कार्यक्रम दिवसभरात होत असतात. अशाच एका ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले दिवंगत नेते अजितदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी यांचा फोटो नव्हता, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते.

Photos of Ajit Pawar, Sunetra Pawar missing from banner, Aditi Tatkare expresses regret

महत्वाच्या बातम्या