Police Recruitment : पोलिस भरतीसाठी आलेल्या मुलांचे आंदोलन !: रस्त्यावर उतरत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी; मरोळ पोलिस कॅम्पबाहेर मोठा गोंधळ

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Police Recruitment मुंबईच्या अंधेरी पूर्व भागातील मरोळ पोलिस कॅम्पमध्ये पोलिस भरती सुरू आहे. या वेळी भरती साठी आलेल्या मुलांनी मोठा गोंधळ निर्माण करत रस्त्यावर उतरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिस भरतीसाठीचा आजचा शेवटचा दिवस होता. सकाळपासून मुलांना मैदान चाचणीसाठी आतमध्ये न घेतल्यामुळे मुलांनी संताप व्यक्त केला. गेल्या दोन दिवसांपासून ही मुले भरतीसाठी आलेली होती व कॅम्पच्या बाहेर रस्त्यावर उभी होती. अखेर आज शेवटी त्यांना आंदोलनाचा मार्ग निवडावा लागला. त्यानंतर मुलांना कॅम्पमध्ये घेतले व मैदान चाचणी घेतली गेली.Police Recruitment

मरोळ पोलीस कॅम्पमधील मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, यामुळे रस्त्यावर झालेल्या गर्दीमुळे परिसरातील सोसायट्यांचे प्रवेशद्वारही बंद झाले आहेत. या परिस्थितीमुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत असून, पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळेच हा सर्व गोंधळ निर्माण झाल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.Police Recruitment



मुंबई पोलिस शिपाई भरती प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांनी मरोळ पोलिस कॅम्पबाहेर मोठा गोंधळ घातला. काही उमेदवारांना ई-मेलद्वारे चाचणीसाठी बोलावण्यात आले होते, तर काहींना कोणताही अधिकृत संपर्क करण्यात आला नसल्याचे समोर आल्याने संतापलेल्या तरुणांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. सकाळपासून प्रवेश न मिळाल्याने उमेदवारांमध्ये मोठा रोष होता, ज्यामुळे मरोळ-मरोशी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे रोखला गेला आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

वाढता गोंधळ आणि आंदोलनाची तीव्रता पाहता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. त्यानंतर रस्त्यावर ठिय्या मांडलेल्या सर्व आंदोलनकर्त्या उमेदवारांना समजूत काढून मैदानी चाचणीसाठी कॅम्पच्या आत प्रवेश देण्यात आला. या कारवाईनंतर मरोळ-मरोशी रस्त्यावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

Police Recruitment Aspirants Protest in Mumbai; Chaos Outside Marol Police Camp

महत्वाच्या बातम्या