विशेष प्रतिनिधी
मुंबई : उत्तर भारतीय मतदारांच्या एका कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांनी आई मराठी मेली तरी चालेल पण उत्तर भारत ही मावशी जगली पाहिजे असे विधान केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित ठाकरे यांनी प्रकाश सुर्वे यांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
अमित ठाकरे म्हणाले की, दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी भाषेविरोधात लाचार वक्तव्य केले आहे. मी आताच ऐकले, किती लाचार वक्तव्य केले आहे. माफी मागितली पण माफी म्हणजे ‘आई मरूदे पण मावशी नाही’. आई म्हणजे मराठी माणसं आणि मावशी म्हणजे उत्तर भारतीय… हेच म्हणणं होतं ना? अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. शिवसेनेने मराठी माणसासाठी राजकारण केले, त्या पक्षातून ते येतात आणि अशी वक्तव्य? माफ करणे हे माझ्या हातात नाही, मराठी माणसांच्या हातात आहे. निवडणुकीत कळेल किती माफ केले ते. कोणाचेच असे वक्तव्य असते तरी लाज वाटली असती. मराठी माणूस आणि बाहेरचे लोक तुम्हाला निवडायला आले तर तुम्ही मराठीला बाजूला टाकणार? संदर्भ चुकलाय का? अतिशय गंभीर आहे. एका माणसाकडून चूक होऊ शकते पण अशी चूक पुढे करू नये
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, “मतांसाठी किती लाचारी करावी माणसाने…! महाशक्तीने कुबड्या काढून घेण्याच्या हालचाली सुरू होताच हे महाशय महापालिका निवडणुकीत मतांसाठी मराठीचाही गळा घोटायला निघालेत. ज्यांना मराठीरुपी आईची किंमत नाही त्यांना उद्या मुंबईची काय किंमत राहील?
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी उत्तर भारतीय समूहाच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, “मी सांगू इच्छितो की, मराठी माझी मातृभूमी आहे, माझी आई आहे, पण उत्तर भारत माझी मावशी आहे. एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी मेली नाही पाहिजे, कारण मावशी जास्त प्रेम करते. आईपेक्षा जास्त प्रेम तुम्ही (उत्तर भारतीय लोकांनी) माझ्यावर केले आहे. तुमचे हेच प्रेम माझ्या सहकाऱ्यांवर सुद्धा कायम ठेवा.
Prakash Surve should be ashamed, Amit Thackeray is angry over his statement about Marathi
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
 - धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
 - मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
 - पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी
 
				
													


















