विशेष प्रतिनिधी
ठाणे : मोर्चाला परवानगी दिली नाही, ही पोलिसांनी भूमिका अत्यंत चुकीची आहे. पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये, असे म्हणत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मी मोर्चात सामील होण्यासाठी निघालो आहे. मला पोलिसांनी अडवून दाखवावे, असे आव्हान दिले आहे. Pratap Sarnaik
मीरा भाईंदर येथे अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मनसेकडून आज ( मंगळवार, ८ जुलै ) मोर्चाचं आयोजन केले होतं. पण, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारत मनसेच्या अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. मनसे नेते, अविनाश जाधव यांना रात्री ३.३० वाजताच ताब्यात घेतली आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि मराठी बांधव मीरा भाईंदर येथे जमा झाले आहेत. पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला आहे. आता मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
सरनाईक म्हणाले, “पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे. मी पोलीस आयुक्तांशी बोलून नाराजी व्यक्त केली आहे. गृहखात्याचे आदेश नव्हते, तरी देखील पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून धरपकड केली, याची माहिती घेत आहोत. व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला परवानगी देता मग मराठी एकीकरण समिती मोर्चा काढत होती. तर तुम्हाला काय अडचण होती? त्यांना मोर्चा का काढू दिला नाही? मीरा रोडमध्ये जे सुरु आहे ते अत्यंत चुकीचं आहे.
मराठी एकीकरण समितीचे नेते गेले तेव्हा त्यांना पोलिसांनी परवानगी नाकारली. काही लोकांना तडीपारीच्या नोटीस दिल्या. पोलीस आयुक्तांसंदर्भात मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. आमदार म्हणून मी हे सहन करणार नाही. मी मोर्चामध्ये सामील व्हायला निघालो आहे. मला पोलिसांनी अडवून दाखवावे,” असे आव्हान मंत्री सरनाईक यांनी दिले आहे.
Pratap Sarnaik challenges police to stop him from participating in the march
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी