विशेष प्रतिनिधी
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये कॅफे खोलला आहे. तिथे लोक चहापाणी करायला येतात. चांगला चहा असेल तर लोक येत असतात, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस हे आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीवर टीका केली. राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे. त्यामुळे राज ठाकरे काय बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात फार काही उलथापालथ होणार नाही.
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, भेट झाली म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. पण कधीकधी काही कामं असू शकतात. काही मैत्रीचे धागे असू शकतात. त्या माध्यमातून ही भेट होऊ शकते. या भेटीचा उद्देश हा काही राज ठाकरे यांच्याबरोबर युतीसाठी चर्चा करण्यासाठी गेले असे म्हणणं योग्य होणार नाही. जेव्हा इतक्या खुलेपणे देवेंद्र फडणवीस गेले याचा अर्थ इथे कोणताही राजकीय हेतू नाही हे समजून घ्यावे.
Raj Thackeray has opened a cafe in Shivaji Park, Sanjay Raut’s entourage on Chief Minister’s visit
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन