विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray पक्षातील कोणीही वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसेच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे नाही असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत.Raj Thackeray
गेल्या काही दिवसांपासून मराठी-अमराठी वादामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधामुळे हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करण्यात आला होता. यानंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र येत विजयी मेळाव्याला संबोधित केले होते. तेव्हापासून राज्यात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी हे आदेश दिले आहेत.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे, त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही. सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.
काही दिवसांपूर्वी मनसेच्या एका कार्यकर्त्याने मीरा-भाईंदरमधील एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती. या घटनेनंतर हजारो हिंदी भाषिक व्यापाऱ्यांनी 2 जुलै रोजी मोर्चा काढला होता. या मोर्चाला भाजपाचा पाठिंबा असल्याचा आरोप करत मनसेने आज मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषिक नागरिकांचा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत जमावबंदी लागू केली होती. याचपार्श्वभूमीवर मोर्चा काढणाऱ्या मनसेच्या प्रमुख नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही मोर्चाच्या ठिकाणी कार्यकर्ते जमल्यामुळे पोलिसांनी त्यांचीही धरपकड केली. त्यानंतर काही वेळाने मोर्चा निघाल्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषेवरून वातावरण तापले होते. दरम्यान, मीरा-भाईंदरमधील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
Raj Thackeray orders leaders and workers not to interact with media, not to respond
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी