विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत एक भावनिक खंत व्यक्त केली. “मी तुरुंगात असताना राज ठाकरेंनी एक फोन तरी करायला हवा होता,” असे ते म्हणाले. Raj Thackeray
राऊत यांच्या नव्या पुस्तकाच्या निमित्ताने पत्रकारांनी राऊत यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले, “राज ठाकरे हे माझे जुने मित्र होते. आमच्यात वैयक्तिक संबंध चांगले होते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून कधी-कधी एक फोनसुद्धा फार मोठा आधार देतो. जेव्हा मी तुरुंगात होतो, तेव्हा माझ्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं होतं. अशावेळी एक दिलासादायक फोन म्हणजे फुंकर असते. राज यांनी एक फोन केला असता, तर तो माझ्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरला असता.” Raj Thackeray
संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात २००० च्या दशकात चांगले संबंध होते. शिवसेनेत राज ठाकरेंना उद्धव ठाकरे यांच्याशी बरोबरीने स्थान देण्यात येत नव्हते, अशा आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज यांनी २००६ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली होती. त्यानंतर दोघे वेगवेगळ्या राजकीय वाटांवर गेले. मात्र संजय राऊत यांनी नेहमीच राज ठाकरेंबद्दल सन्मानानेच बोलणे पसंत केले आहे.
याच संवादात जेव्हा पत्रकारांनी विचारले की, “मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील युतीची चर्चा आता थांबली का?”, यावर राऊत म्हणाले, “तुम्हाला वाटतं तसं काहीच थांबलेलं नाही. तुम्ही फक्त नेत्यांच्या स्टेटमेंटवरूनच अंदाज लावता, पण प्रत्यक्षात पडद्यामागे काहीतरी वेगळं चालू आहे. सध्या एक नाट्य लिहिलं जात आहे, आणि त्याची पटकथा लवकरच उलगडेल. बाळंतपण होऊ द्या. आम्ही सकारात्मक आहोत.”
Raj Thackeray should have made at least one phone call, Sanjay Raut’s emotional regret
महत्वाच्या बातम्या
- सी-व्होटर सर्व्हेचा निष्कर्ष : देशवासीयांचा भारतीय लष्करावर दृढ विश्वास, शस्त्रसंधीलाही दिला मोठा पाठिंबा
- Prime Minister Narendra Modi : आदमपूर एअरबेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट आणि पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांची पोलखोल
- Sharad Pawar : शरद पवार गटाची बैठक अन् अंकुश काकडे यांचा एकत्रिकरणाबाबत विराेधाचा सूर
- Tiranga Yatra : ऑपरेशन सिंदूरचे यश साजरे करण्यासाठी भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा