विशेष प्रतिनिधी
मुंबई: सोनिया गांधी यांचे पाय चाटण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. पाल मेल्यानंतर शेपटी वळवळते तेवढी तुमची शिवसेना शिल्लक आहे, अशी विखारी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.Ramdas Kadam
कदम म्हणाले, आम्ही महाराष्ट्राची अस्मिता जपली, बाळासाहेबांचे विचार जपले. भगव्याला अधिक तेज आणण्याचं काम आम्ही केले आहे. दिवा विझताना आधी फडफडतो तशीच फडफड सध्या संजय राऊत यांची चालू आहे.
संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घेतलेल्या टीकेचा समाचार घेताना कदम म्हणाले, आकाशाकडे बघून थुंकलो की ती थुंकी पुन्हा आपल्याच तोंडावर उडते याचे त्यांना भान आहे का? यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रीच नाही तर दिवसाही स्वप्नात दिसतात. कारण त्यांनी तुमचा नायनाट केला, भ्रष्टाचार थांबवला.
त्यामुळे लढाईच्या वेळी मोघलांना पाण्यामध्ये जसे संताजी -धनाजी दिसायचे तसे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत यांना केवळ एकनाथ शिंदेंच दिसतात. तुम्हाला महाराष्ट्र वैतागला आहे, तुम्हाला चॅनलवर पाहिलं की लोकं चॅनल बदलतात. पाला मेल्यानंतर शेपटी वळवळते आता तेवढीच तुमची शिवसेना शिल्लक आहे.
Ramdas Kadam’s criticism of Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…